मुक्तपीठ टीम
भाजापा नेते किरीट सोमय्या यांनी शंभर कोटीचा आरोप करत टार्गेट केलेले जालन्याचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यानंतर आता पुढचे टार्गेट कोण, असा प्रश्न चर्चेत आला आहे. तीन दिवसांपूर्वी निरज गुंडे यांनी ट्वीट करत मविआ मंत्रिमंडळातील एका कॅबिनेट मंत्र्याकडे बोट दाखवले होते. त्यामुळे तो कॅबिनेट मंत्री नेमका कोण, अशी चर्चा सुरु झाली आहे.
अर्जुन खोतकर यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप
- भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे.
- मविआतील २३ जणांची चौकशी सुरु आहे.
- त्यात अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळीही आहेत.
- मी अर्जुन खोतकर यांचं नाव घेत आहे.
- अर्जुन खोतकर यांनी १०० कोटींचा घोटाळा केला. त्याची तक्रार आयकर विभाग आणि ईडीकडे तक्रार केलीय.
- अर्जुन खोतकर यांनी रामनगर कारखाना बेनामी पद्धतीने फसवून घेतला आहे.
- तापडियाकडे ज्या धाडी पडल्या त्या खोतकर यांच्याशी संबंधितच होत्या.
पवारांचा कोर्ट, एजेंसी आणि भाजपाला धमकावण्याचा उद्देश!
- तापडिया आणि खोतकरांनी मिलिभगत करुन कारखान्याचा घोटाळा केलाय.
- कारखान्याची १०० एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
- त्या जमिनीवर कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
- अर्जुन खोतकर यांची १०० कोटीचा कारखाना आणि १ हजार कोटींच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या घोटाळ्याची चौकशी सुरु झाली असल्याचं सोमय्या म्हणाले.
- तसंच शरद पवार यांचा ईडी अधिकारी, आयकर विभागाचे अधिकारी, हायकोर्ट आणि भाजपाला धमकी देण्याचा उद्देश होता, असा आरोपही सोमय्या यांनी केलाय.
गुंडेंनी ट्वीट केले ‘तो’ मंत्री कोण?
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे आणि मधल्या काळात त्यामुळे वादाच्या भोवऱ्यातही सापडलेले निरज गुंडे यांचं नवं ट्वीट चर्चेचा विषय ठरलं आहे.
- त्यांनी चार दिवसांपूर्वी “एका व्हिसल ब्लोअरने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या बेनामी मालमत्तेची तपशीलवार कागदपत्रे आयकर विभागाकडे दिली आहेत.
- पडताळणी पुढील टप्प्यात आहे आणि लवकरच कार्यवाही अपेक्षित आहे”! असे ट्वीट केले.
- तेव्हापासून गुंडेंनी उल्लेख केलेला तो कॅबिनेट मंत्री कोण, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Sources have confirmed that a Whistle Blower had given detailed documents of Benami Properties belonging to Maharashtra MVA Cabinet Minister to Tax Authorities. The verification is in advanced stage & action expected very soon ! @Dev_Fadnavis @PMOIndia @narendramodi @AmitShah
— Niraj (@NirajGunde) November 17, 2021