Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सामाजिक न्याय विभागाचे ८७५ कोटी पळवल्याचा आरोप!

मंत्रिमंडळाचा निर्णय मागे घेण्याची आंबेडकरी संग्रामची मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Cabinet decision

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारचे तीन शेतकरीविरोधी कायदे मागे घेतल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. त्या पाठोपाठ नागपूर कामठी येथील सरकारी रुग्णालय- वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा 75 टक्के खर्च सामाजिक न्याय खात्याच्या माथी मारण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णयही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी पुढे आली आहे.

 

आंबेडकरी संग्रामचे अध्यक्ष प्रा डॉ जी के डोंगरगावकर आणि सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी ही मागणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने 6 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

 

त्या निर्णयानुसार, नागपूर कामठी येथील नियोजित सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी सामाजिक न्याय खात्याचे 875 कोटी रुपये पळवण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्या रुग्णालयासाठी 75 टक्के खर्च विशेष घटक योजनेतून करण्यात येईल, असे मंत्रिमंडळ निर्णयात नमूद आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

राज्यातील अनुसूचित जातींच्या विकासासाठी संविधानिक अधिकारानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद केली जाते. मात्र प्रत्यक्षात देय असलेल्या निधीपेक्षा कमी निधी दिला जात असतानाच सामाजिक न्याय खात्याच्या अपुऱ्या निधींवरही नंतर डल्ला मारला जातो, असे आंबेडकरी संग्रामचे म्हणणे आहे.

 

प्रा डोंगरगावकर पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या अखिल भारतीय अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष असलेले राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हट्टापायी मंत्रिमंडळाने सामाजिक न्याय खात्याचे 875 कोटी रुपये नागपूर कामठी येथील सरकारी रुग्णालयाच्या उभारणीसाठी वळवले आहेत. नागपूरचे पालकमंत्री असलेल्या राऊत यांनी सवंग लोकप्रियतेसाठी दलितांच्या विकास निधीवर दरोडा घातला आहे.

 

दलितांचा विकास मुंडे कसा करणार?

राज्याचे 2021- 2022 या वर्षाच्या 3 लाख 80 हजार कोटींच्या अर्थसंकल्पातून 13 टक्के अनुसूचित जातींसाठी 50 हजार कोटी मिळणे क्रमप्राप्त होते. पण सामाजिक न्याय खात्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या 2 टक्के म्हणजे 6 हजार 788 कोटी देण्यात आले. आता त्यातूनही 875 कोटी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पळवले आहेत. उरलेल्या 5 हजार 913 कोटींमध्ये धनंजय मुंडे हे दलितांचा काय विकास साधणार, असा सवाल डॉ डोंगरगावकर यांनी केला आहे.

 

20 वर्षात पळवले 15 हजार कोटी!

सामाजिक न्याय खात्याचा निधी पळवण्याचे, अन्यत्र वळवण्याचे आणि अखर्चित ठेवून
लॅपज्ड होऊ देण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आले आहेत. त्यातून गेल्या 20 वर्षांत सुमारे 15 हजार कोटी रुपये सामाजिक न्याय खात्याकडून हिसकावले असा गौप्यस्फोट ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी केला आहे.

 

सामाजिक न्याय खात्याचा निधी दलितांच्या हितासाठीच खर्च करण्याचे बंधन घालणारा कायदा आंध्र, कर्नाटक या राज्यांत आहे. पण तसा कायदा फुले, शाहू, डॉ आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात नाही. त्यामुळे सामाजिक न्याय खात्याचा निधी पळवण्यास रान मोकळे मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.


Tags: Ambedkar SangramcabinetCabinet decisionmuktpeethsocial justice departmentआंबेडकरी संग्राम मागणीमंत्रिमंडळमुक्तपीठसामाजिक न्याय खातेसामाजिक न्याय विभाग
Previous Post

आंध्र, तामिळनाडूत पावसाचा हाहाकार! पाण्यातून वाहत गेले मृतदेह! सबरीमाला मंदिरही बंद!

Next Post

खोतकरांनंतर आता भाजपाच्या पुढच्या टार्गेटची चर्चा, निरज गुंडेंनी संकेत दिले ‘तो’ कॅबिनेट मंत्री कोण?

Next Post
who is that mva cabinet minister in bjp target list

खोतकरांनंतर आता भाजपाच्या पुढच्या टार्गेटची चर्चा, निरज गुंडेंनी संकेत दिले 'तो' कॅबिनेट मंत्री कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!