मुक्तपीठ टीम
गुजरात दंगलीतील पीडितांसाठी उभारलेल्या न्यायालयीन लढ्यासाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्टा सेटलवाड यांना श्रीकुमार यांच्यासह अटक करण्यात आली आहे. एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुजरात एटीएसने सेटलवाड यांना मुंबईतील घरातून ताब्यात घेतले. आज त्यांना अटक दाखवण्यात आले. गुजरात दंगलीपासून आजवर सतत चर्चेत राहिलेल्या तिस्टा सेटववाड यांचा पत्रकारिता ते सामाजिक कार्यापर्यंतचा प्रवास…
तिस्टा सेटलवाड: पत्रकार ते कार्यकर्ता!
- तिस्टा सेटलवाडांचा जन्म १९६२ मध्ये महाराष्ट्रात झाला.
- त्या मुंबईत वाढली आणि मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली.
- त्यांचे वडील अतुल सेटलवाड हे वकील होते आणि आजोबा एम सी सेटलवाड हे देशाचे पहिले ऍटर्नी जनरल होते.
- तिस्टा सेटलवाड यांनी कायद्याचे शिक्षण मधेच सोडून पत्रकारितेकडे केली.
- त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले.
- त्यांनी पत्रकार जावेद आनंद यांच्याशी लग्न केले
- काही काळानंतर लोकांसोबत सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीस नावाची एनजीओ सुरू केली.
- तीस्ता सेटलवाड यांना २००७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- त्यांना २००२मध्ये राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारही मिळाला आहे.
- तिस्टा सेटलवाड गुजरात दंगलीतील पीडितांसाठी लढत आहेत.
ज्यांच्यासाठी लढल्या त्यांनीच केला फसवणुकीचा आरोप!
- त्यांच्यावर परदेशातून पैशांचा गैरवापर आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे.
- २०१३ मध्ये अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीतील १२ रहिवाशांनी तिस्टाविरोधात चौकशीची मागणी केली होती.
- गुलबर्ग सोसायटीत म्युझियम बांधण्यासाठी तिस्ताने परदेशातून सुमारे दीड कोटी रुपये जमा केले होते.
- दीड कोटी रुपयांचा योग्य वापर झाला नसल्याचा आरोप समाजातील लोकांच्या वतीने करण्यात आला.
- २०१४मध्ये तीस्ता आणि तिचा पती जावेद आनंद यांच्याविरोधात गुन्हे शाखेने एफआयआर नोंदवला होता.
आरोप करणाऱ्या तिस्टा सेटलवाडच आरोपी झाल्या!
- २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांना एसआयटी पथकाने दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.
- सेटलवाड यांच्या एनजीओने झाकिया जाफरीला त्यांच्या कायदेशीर लढाईत पाठिंबा दिला.
- गुजरात दंगलीनंतर तिस्टा सेटलवाड कायदेशीर मोहीम आणि तिची एनजीओ यांबद्दल दीर्घकाळ चर्चेत आणि वादात आहेत.
- तिस्टा सेटलवाड यांच्या परदेशातील संबंधांबद्दल त्यांचे माजी सहकारी रईस खान पठाण यांनी न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात केला होता.
“तिस्टा सेटलवाडांच्या मोहिमेमागे काँग्रेस आणि सोनिया गांधी” – भाजपाचाआरोप
- सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेचा हवाला देत भाजपाने सामाजिक कार्यकर्त्या तिस्टा सेटलवाड यांच्यावर आरोप केला आहे.
- सेटलवाड यांच्या दंगलप्रकरणीच्या मोहिमेमागे काँग्रेस आणि त्यांच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचाच हात असल्याचा आरोप भाजपाने केला.
- भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने छुप्या हेतूने दंगलीसंदर्भात प्रकरण तापवणाऱ्यांना फटकारताना सेटलवाड यांचे नाव घेतले.
- पात्रा म्हणाले की, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की प्रक्रियेचा गैरवापर करणाऱ्या सर्वांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे.
तिस्टा सेटलवाडांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप
- तिला झालेली अटक बेकायदेशीर आणि जीवाला धोका असल्याची तक्रार तीस्ता सेटलवाडने मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात केली होती
- अहमदाबाद पोलिसांनी सेटलवाडला तिच्या सांताक्रूझ येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले
- सेटलवाडांचे वकील विजय हिरेमठ यांनी आरोप केला की, त्यांना गुजरात दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.
- आम्हाला या प्रकरणाची अगोदर माहिती देण्यात आली नव्हती.
- बळजबरीने घरात घुसून त्यांना सोबत नेण्यापूर्वी मारहाण केली.