मुक्तपीठ टीम
कोरोनाविरुद्धच्या या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्य सकारचे कौतुक केले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक प्रश्न विचारला आहे, “फडणवीसजी, आजच मा. पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे की योग्य कोण, मा. पंतप्रधान की तुम्ही?”
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र लिहिले होते. हे पत्र त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते. या ट्विटला उत्तर देताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला.
जयंत पाटीलांचं ट्विट
- देवेंद्र फडणवीसजी आजच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
- मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही?
@Dev_Fadnavis जी, आजच मा. @PMOindia यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल.
आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही? https://t.co/kpIk2341Tf— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 8, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून महाराष्ट्राचे कौतुक
- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्र करीत असलेली कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरें यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे १५ ते २० मिनिटे चर्चा झाल्याचं कळतं.
- यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
- रेमडेसिवीर इंजेक्शन्स, ऑक्सिजन, लॉकडाऊन, १८ वर्षांवरील व्यक्तिंचं लसीकरण आणि राज्यातील वाढत्या मृत्यूंवर पंतप्रधानांनी माहिती घेतली.
- यावेळी दुसऱ्या लाटेशी सामना करताना महाराष्ट्राने चांगली कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.
या संपूर्ण प्रकरणातील घटनाक्रम समजून घेण्यासाठी पुढील तीन लिंक क्रमाने क्लिक करा:
घटना – १
मोदींकडून महाराष्ट्राचे कौतुक, ठाकरेंकडून केंद्राचे आभार!
घटना – २
“कोरोना आकड्यांची बनवाबनवी तात्काळ थांबवा” विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
घटना – ३
“मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयानं केली तर फडणवीसांना पोटदुखीची अपेक्षा नव्हती!”
“मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयानं केली तर फडणवीसांना पोटदुखीची अपेक्षा नव्हती!”