दुर्गराज नगरकर
शेतकरी म्हटलं कि, नशीबी येतात फक्त काबाड कष्ट.. राब राब शेतात राबायचं अन्न-धान्य शेतात पिकवायचं त्या पिकवलेल्या अन्न-धान्याच मोल त्याला मिळत का? का तो फक्त शेतात राबणार बैलचं आहे असं हि कधी वाटत…
दोन महिन्यापासून दिल्लीत आंदोलन सुरु आहे. नवा इतिहास घडविणारं हे आंदोलन आहे.हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांसाठी आहे, असे मानण्याचे कारण नाही, केद्र ,सरकारने व्यापाऱ्यासाठी हे कायदे केलेले दिसत आहेत हे नक्कीच, तेव्हा हे आंदोलन एवढं पेटलं आहे.
कृषी क्षेत्राशी संबंधित खाली दिलेल्या तीन कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यासाठीचं हे आंदोलन सुरू आहे.
तीन नवे कायदे –
१) शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020
२) शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020
३) अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020
या कायद्यांमध्ये काही बदल केले जावे अशी विनंती त्यांनी क्रेंद्र सरकारला शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु सरकार या मागण्या पूर्ण करत नाही, शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र होत आहे… मात्र या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण मिळालं आहे.
दिल्लीच्या सीमांवर ट्रॅक्टर रॅलीत राडा
झाला…आंदोलनाने हिंसक रुप धारण केलं आहे…शेतकरीचं शेतकऱ्याचं नुकसान करताना दिसत होते..पोलीसांनी शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात लाठीमार केला . परतु हे आंदोलन खुप मोठ्या प्रमाणात चिखळण्या मागे हात कुणाचाआहे? लोक शांततापूर्ण पद्धतीने आंदोलनात बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कोण आहेत हे समजलं पाहिजे, कि हे राजकीय पक्षांची माणसं नाहीत ना?.. कि ते आंदोलनाची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
जो शेतकरी बांधव दोन महिने शांततामय आंदोलन करत होता तो हिंसक का झाला आहे? या आंदोलन पेटवण्या मागे हात कुणाचा? यातून केंद्र सरकारला काय साध्य करायचं आहे? खरचं शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? अजूनही केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा हवा..दिल्लीत जे घडलं त्याला जबाबदार कोण ? खरचं हा देश प्रजासत्ताक झाला का असा प्रश्न निर्माण होतो.