मुक्तपीठ टीम
पीएनबी घोटाळ्यातला फरार आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. चोक्सी हा डोमिनिकामधून क्युबामध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. तो बोटीने डोमिनिकामध्ये पोहोचला. अँटीगुआने त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्यानंतर त्याला डोमिनिका पोलिसांनी अटक केली आहे. कायद्यानुसार अँटीगुआकडे आता त्याचा ताबा दिला जाण्याची शक्यता आहे. पण अँटीगुआने त्याला थेट भारतातकडे सोपवले जावे, असं म्हटले आहे. त्यामुळे लकरच भारताला त्याचा ताबा मिळू शकतो. रहस्यमय पद्धतीने गायब होणे, त्यानंतर नाट्यमयरीत्या पकडलं जाणे यामुळे सध्या चर्चेत असलेल्या मेहुल चोक्सीबद्दलचा प्रवासही गूढ आहे.
कोण आहे मेहुल चोक्सी?
- गीतांजली जेम्स कंपनीचा मालक
- ही कंपनी हिरे निर्यात आणि विक्री करत असे
- भारतात गीतांजली जेम्सचे अनेक शोरुम
- मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातला आणखी एक आरोपी नीरव मोदीचा मामा आहे
- पीएनबी घोटाळ्यात मामा-भाचा आरोपी
- घोटाळ्यानंतर दोघेही देश सोडून फरार
काय आहे घोटाळा?
- फेब्रुवारी २०१८ मध्ये पीएनबी घोटाळा उघड झाला.
- यात १३ हजार कोटींहून अधिकचा गैरव्यवहार झाल्याचं उघड
- नीरव आणि मेहुलने लेटर ऑफ अंडरटेकिंग्जद्वारे बँकांमधून पैसा घेऊन परदेशात ट्रान्सफर केला.
- पीएनबीचे काही कर्मचाऱ्यांना कथितरित्या नीरव मोदीच्या कंपन्यांना लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज (LoU) जारी केले होते.
- हे लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज एकप्रकारची क्रेडिट नोट होती
- मेहुलने गीतांजली कंपनीद्वारे हजारो कोटी रुपयांची रक्कम इटली, जपान, थायलंड, अमेरिका, यूएई, यूके आणि बेल्जिअममध्ये पाठवली.
- चोक्सीने हाँगकाँगमध्ये ६, दुबईत ९ खोच्या कंपन्या बनवल्या होत्या.
- हवाल्यामार्फत पैसा इतरत्र हलवणं हेच या कंपन्यांचं मुख्य काम होतं.