Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रद्रोही कोण? शिवसेना X भाजपाचा परराज्यांच्या मुख्यमंत्री स्वागतावरुन नवा वाद!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
who betrayed maharashtra ss bjp war

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रद्रोही कोण? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हा वाद रंगला आहे. मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर सुरु झालेला वाद शिवसेना आणि भाजपा या एकेकाळच्या मित्रांमध्ये रंगला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे अर्धे मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत रोड शो करत आहेत. व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोड शोला आम्ही लूट म्हणतो, अशी घणाघाती टीका केली. त्यांना प्रत्युत्तर देताना भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेने आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी पायघड्या टाकल्या. त्यांचा दूत म्हणून काम केले. त्यांनी त्यांच्यासाठी बैठका ठरवल्याचाही संशय आहे. हा महाराष्ट्र द्रोह आहे, असे सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

 

…त्यावेळी भाजपाला मिरच्या का झोंबल्या? संजय राऊत

  • शिवसेना खासदार संजय राऊतयांनी विरोधकांना पोटशूळ उठला असल्याची टीका केली आहे.
  • ममता बॅनर्जी आल्या मुंबई या उद्योगनगरीचं माहिती घेतली.
  • मुंबईतल्या उद्योगपतींचे देशभरात व्यवसाय आहेत.
  • ममता बॅनर्जींनी त्या उद्योगपतींना कोलकात्यात लक्ष देण्याचं आवाहन केलं त्यात काय चुकलं असं संजय राऊत म्हणाले.
  • आज गुजरातचे मुख्यमंत्री पटेल अर्धे मंत्रिमंडळ मुंबईत घेऊन आले आहेत.
  • व्हायब्रंट गुजरात तिकडे मुंबईत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
  • मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातला पळवलं.
  • आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला पळवलं.
  • आनंदीबेन पटेल यांनी मुंबईत काय ठेवलंय, अशी वक्तव्य केलं होतं, त्यावेळी भाजपला मिरच्या का झोंबल्या, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

 

शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह उघडा पडला- आशिष शेलार

  • महाराष्ट्रातील उद्योग कारखाने पळवण्यासाठी आलेल्या ममतादिदीं सोबत छुपी बैठक करुन शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह उघडा पडला आहे.
  • सत्तेतले लोक ममता बॅनर्जींचे दूत म्हणून काम करत असल्याचे दिसून येत आहे.
  • जे पराभूत मनोवृत्तीचे आहेत, ते काय ठरवणार, असा सवाल त्यांनी केला.
  • याचा अर्थ स्पष्ट आहे की, ममता बॅनर्जी ऐकत नाहीत.
  • शेलार पुढे म्हणाले की, शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह आता त्यांच्या लक्षात आला आहे.
  • त्यामुळे संजय राऊत पांघरूण घालायचे.
  • हा राजशिष्टाचार ममतांसाठी आहे.
  • तो इतरांसाठी का नाही.

 

बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना प्रियंका जे बोलल्या ते पसंत नाही

  • सावरकरांच्या वक्तव्याबद्दल प्रियांका चतुर्वेदी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
  • कुठलाही शिवसैनिक सावरकरांचा असा उल्लेख करणार नाही.
  • शिवसैनिकांना हे सहन होणार नाही.
  • जे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत.
  • त्यांना हा सावरकरांचा अपमान कधीच मान्य होणार नाही.
  • हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या लोकांना तुम्ही भेटता, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
  • बाळासाहेबांचे शिवसैनिक यांना देखील प्रियंका चतुर्वेदी जे बोलल्या ते पसंत नाही.
  • हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

 


Tags: BJPMaharashtraMamata BanerjeeShivsemaआशिष शेलारभाजपाममता बॅनर्जीमहाराष्ट्रशिवसेनासंजय राऊत
Previous Post

समतेचा एल्गार नाटक “लोक-शास्त्र सावित्री” ला नाशिककरांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद!

Next Post

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

Next Post
varsha gaikwad

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!