मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रद्रोही कोण? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हा वाद रंगला आहे. मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर सुरु झालेला वाद शिवसेना आणि भाजपा या एकेकाळच्या मित्रांमध्ये रंगला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे अर्धे मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत रोड शो करत आहेत. व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोड शोला आम्ही लूट म्हणतो, अशी घणाघाती टीका केली. त्यांना प्रत्युत्तर देताना भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेने आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी पायघड्या टाकल्या. त्यांचा दूत म्हणून काम केले. त्यांनी त्यांच्यासाठी बैठका ठरवल्याचाही संशय आहे. हा महाराष्ट्र द्रोह आहे, असे सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
…त्यावेळी भाजपाला मिरच्या का झोंबल्या? संजय राऊत
- शिवसेना खासदार संजय राऊतयांनी विरोधकांना पोटशूळ उठला असल्याची टीका केली आहे.
- ममता बॅनर्जी आल्या मुंबई या उद्योगनगरीचं माहिती घेतली.
- मुंबईतल्या उद्योगपतींचे देशभरात व्यवसाय आहेत.
- ममता बॅनर्जींनी त्या उद्योगपतींना कोलकात्यात लक्ष देण्याचं आवाहन केलं त्यात काय चुकलं असं संजय राऊत म्हणाले.
- आज गुजरातचे मुख्यमंत्री पटेल अर्धे मंत्रिमंडळ मुंबईत घेऊन आले आहेत.
- व्हायब्रंट गुजरात तिकडे मुंबईत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
- मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातला पळवलं.
- आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला पळवलं.
- आनंदीबेन पटेल यांनी मुंबईत काय ठेवलंय, अशी वक्तव्य केलं होतं, त्यावेळी भाजपला मिरच्या का झोंबल्या, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह उघडा पडला- आशिष शेलार
- महाराष्ट्रातील उद्योग कारखाने पळवण्यासाठी आलेल्या ममतादिदीं सोबत छुपी बैठक करुन शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह उघडा पडला आहे.
- सत्तेतले लोक ममता बॅनर्जींचे दूत म्हणून काम करत असल्याचे दिसून येत आहे.
- जे पराभूत मनोवृत्तीचे आहेत, ते काय ठरवणार, असा सवाल त्यांनी केला.
- याचा अर्थ स्पष्ट आहे की, ममता बॅनर्जी ऐकत नाहीत.
- शेलार पुढे म्हणाले की, शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह आता त्यांच्या लक्षात आला आहे.
- त्यामुळे संजय राऊत पांघरूण घालायचे.
- हा राजशिष्टाचार ममतांसाठी आहे.
- तो इतरांसाठी का नाही.
बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना प्रियंका जे बोलल्या ते पसंत नाही
- सावरकरांच्या वक्तव्याबद्दल प्रियांका चतुर्वेदी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
- कुठलाही शिवसैनिक सावरकरांचा असा उल्लेख करणार नाही.
- शिवसैनिकांना हे सहन होणार नाही.
- जे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत.
- त्यांना हा सावरकरांचा अपमान कधीच मान्य होणार नाही.
- हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या लोकांना तुम्ही भेटता, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
- बाळासाहेबांचे शिवसैनिक यांना देखील प्रियंका चतुर्वेदी जे बोलल्या ते पसंत नाही.
- हे सांगायलाही ते विसरले नाहीत.