Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला, “साठ वर्षांवरील लोकांनी प्रवास टाळावा!”

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
WHO

मुक्तपीठ टीम

कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन नवा व्हेरिएंट जगभर चिंता वाढवत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे धोकादायक परिस्थिती या नव्या व्हेरिएंटमुळे निर्माण होऊ नये यासाठी अनेक देशांनी काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. याच खबरदारीतून अनेक देशांमध्ये प्रवासावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. पण ‘केवळ प्रवासावर निर्बंध लावून नव्या व्हेरिएंटचा प्रसार कमी होणार नाही, त्यामुळे ६० वर्षांवरील लोकांनी प्रवास टाळावा’ असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

 

ओमिक्रॉन विषाणू अतिशय धोकादायक!

  • ओमिक्रॉन विषाणू अतिशय धोकादायक असल्याचे वर्णन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
  • लसीकरण टाळणाऱ्या व्यक्तींमुळे, रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे या विषाणुचा प्रसार अधिक होण्याची शक्यता वर्तवली आहे.
  • नव्या व्हेरीएंटबाबत अजूनही सर्वत्र अनिश्चतता आहे, त्यामुळे सावध राहण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

आधी कोरोना झालेल्यांना धोका जास्त

  • प्राथमिक निरीक्षणावरून असे दिसून आले आहे की ज्या लोकांना यापूर्वी कोरोना संसर्ग झाला आहे, त्यांना नव्या व्हेरिएंटपासुन अधिक संरक्षणाची आवश्यकता आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेकडुन याबाबत माहिती देण्यात आली.
  • नवीन व्हेरिएंटचे संक्रमण आधी कोरोना झालेल्या व्यक्तींना वेगाने होऊ शकते.
  • त्यामुळे अशा व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक आहे.

 

कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीच सर्वात धोकादायक!

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या मते डेल्टा किंवा डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या व्हेरीएंटचा सर्वाधिक संसर्ग कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या व्यक्तींना झाला.
  • कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये देखील अनेक जणांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होती.
  • यावरून रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे सर्वात धोकादायक असल्याचे स्पष्ट होते.

 

लसीकरण पूर्ण होणे आवश्यक

“संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करण्यासाठी जितका जास्त वेळ घेतो तितक्या वेगाने व्हायरस म्युटेट होईल आणि वेगाने पसरेल. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. लसीचे दोन्ही डोस देणे आवश्यक आहे.” असे डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी सांगितले आहे. यासोबतच कोरोनाविरुद्ध अजून एक दीर्घ लढाई लढायची आहे, असे देखील ते म्हणाले.

 

ओमिक्रॉन धोकादायक – जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे निर्माण होणाऱ्या जागतिक धोक्याबद्दल कठोर आणि स्पष्ट इशारा जारी केला आहे. आतापर्यंतच्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट गंभीर परिणाम घडवू शकतात. जपान, फ्रान्स आणि स्पेनमध्ये ओमिक्रॉन संसर्गाची चिंताजनक नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे.


Tags: coronamuktpeethOmicronWHOWorld Health Organisationओमिक्रॉनकोरोनाजागतिक आरोग्य संघटनामुक्तपीठ
Previous Post

अ‍ॅडमिरल आर हरी कुमार भारतीय नौदलाचे २५वे प्रमुख! पदभार स्वीकारतानाची ‘ती’ ह्रदयस्पर्शी घटना

Next Post

अँड्रॉइड यूजर्सना इशारा! ‘हे’ धोकादायक अॅप्स त्वरित अनइंस्टॉल करा!!

Next Post
android users

अँड्रॉइड यूजर्सना इशारा! 'हे' धोकादायक अॅप्स त्वरित अनइंस्टॉल करा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!