मुक्तपीठ टीम
लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. लग्न म्हटलं की, कपडे खरेदी, शॉपिंग आणि सर्वात महत्वाची खरेदी म्हणजे सोन्याची. याच काळात सोन्याची सर्वाधिक विक्री होते. सोने खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, कारण योग्य माहिती नसल्यामुळे अनेक ग्राहकांची फसवणूकही होते. चला तर मग जाणून घेवूया सोनं खरेदी करताना नक्की तपासून पाहा ‘या’ बाबी…
सोने खरेदी करताना ही काळजी घ्या…
- सोन्याचा दर नेहमी तपासा.
- नेहमी हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करा.
- हॉलमार्कमुळे सोन्याची शुद्धता सुनिश्चित केली जाते.
- कुठूनही खरेदी करा, जीएसटी बिल घेणे आवश्यक आहे.
- जीएसटी बिलमुळे कोणतीही समस्या किंवा फसवणूक झाल्यास तुम्ही तक्रार करू शकता.
- गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करत असाल तर दागिन्यांऐवजी सोन्याची नाणी किंवा बार खरेदी करा.
- BIS हॉलमार्क मानकांनुसार २४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध असणे आवश्यक आहे.
सोने कसे मोजले जाते?
- भारतात सोने तोळ्याने मोजले जाते.
- एक तोळा म्हणजे २४ कॅरेट सोने.
कॅरेट म्हणजे काय?
- कॅरेट धातूची शुद्धता मोजते.
- २४ कॅरेट हे सर्वात शुद्ध सोने आहे.
- कॅरेट क्रमांक सहसा धातूवर स्टँप केलेला नसतो.
- ती संख्या शुद्ध सोन्याच्या टक्केवारीशी जोडलेली आहे.
- २२ कॅरेट सोने ९१.६% शुद्ध आहे.
- यात जस्त, चांदी किंवा तांबे यांसारख्या मिश्र धातु वापरले जातात.
- २२ कॅरेट सोने सुंदर आहे.
- १८ कॅरेट सोने ७५% सोने आहे.
- पांढऱ्या सोन्यासाठी ही सर्वोच्च शुद्ध आहे.
- ज्याला पांढरा रंग मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चांदी आणि/किंवा प्लॅटिनमची आवश्यकता असते.
- १२ कॅरेट सोने हे १२ भाग सोन्याचे, १२ भाग दुसर्या धातूचे बनलेले असते.
- त्यामुळे ते ५० टक्के शुद्ध सोने आहे.
- ९ कॅरेट सोने ३७.५% शुद्ध आहे.