मुक्तपीठ टीम
अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत तो बंद करण्यात येत आहे. सोमवारपासून तो पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यावर अंधेरीच नाही तर तेथे ये जा करणाऱ्या इतर वाहनचालकांचीही मोठी गैरसोय होणार आहे. प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग शोधण्याची विनंती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना केली आहे. पोलीस पर्यायी मार्ग सुचवतीलच, पण स्थानिक जाणकारांनी सुचवलेले पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत:
पर्याय -१
- हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल
- उत्तरेकडून येणाऱ्यांसाठी तसेच स्वामी समर्थ नगर, लोखंडवाला, वीरा देसाई – उत्तर भाग, आंबोली – वीरा देसाईजवळील भाग, आझाद नगर, गुंदवली, मालपाडोंगरी, मेघवाडी या भागातील रहिवाशांसाठी जोगेश्वरी अंधेरी दरम्यानचा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल
पर्याय -२
- अंधेरी सब वे
- आंबोली, अंधेरी मार्केट, मोगरापाडा यासाठी अंधेरी सबवे
पर्याय -३
- विलेपार्ले कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल
- कोलडोंगरी, अंधेरी रेल्वे स्थानक परिसार, तेलीगल्ली, डीएन नगर, यारी रोड, अंधेरी गावदेवी, जुहू गल्ली भागातील रहिवाशांसाठी विलेपार्ले पश्चिम भागातून पूर्वेकडे जाणारा पार्ले बिस्कीट जवळचा कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल
- पूर्वेकडे जाणारा पार्ले बिस्कीट जवळचा कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल