Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्रॅफिक अलर्ट: अंधेरी पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपूल सोमवारपासून वाहतुकीला बंद! नव्याने बांधणार!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gokhale Bridge (2)

मुक्तपीठ टीम

मुंबई मनपाने नियुक्त केलेल्या कन्सल्टन्सी फर्मने गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा महत्वपूर्ण पूल पुढील आठवड्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. याठिकाणी तब्बल १६० कोटी रुपये खर्च करून चार मार्गिकांचा नवीन पूल बांधण्याची योजना आहे. यासाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग शोधण्याची विनंती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना केली आहे.

गोखले पूल वाहतुकीसाठी धोकादयक!!

  • जुलै २०१८ मध्ये गोखले पुलाचा एक भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळचा हिमालय पूल कोसळून सातजणांचा बळी गेला.
  • शहरातील पुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई मनपाने आयआयटी-मुंबईला सर्व पुलांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते.
  • तोपर्यंत गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी अर्धवट खुला ठेवण्यात आला होता, त्यामुळे परिसरात नाकेबंदी करण्यात आली होती.
  • १९७५मध्ये बांधण्यात आलेल्या या पुलाला भेगा पडल्याने तो धोकादायक बनला असल्याचे सांगत पाडण्याचा सल्ला देण्यात आला.

पूल पाडण्याचे आणि पुनर्बांधणीचे काम प्रगतीपथावर!!

  • सध्या कार्यान्वित असलेल्या गोखले पुलाच्या काही भागाला भेगा पडल्या असून आतील स्टीलही जीर्ण झाले आहे. कन्सल्टन्सी फर्मने सांगितले की हा पूल धोकादायक असून तो वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा.
  • पुल विभागाने पोलिस वाहतूक सहआयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला असलेला पुलाचा टप्पा २ भाग असुरक्षित आहे. व ते तात्काळ प्रभावाने बंद करावे.
  • मेसर्स एसएमएस लिमिटेड या नियुक्त कंत्राटी एजन्सीद्वारे अंधेरी येथील विद्यमान गोखले पूल पाडण्याचे आणि पुनर्बांधणीचे काम प्रगतीपथावर आहे.
  • सध्या उत्तरेकडील पुलाचा अर्धा भाग पाडण्यात आला आहे आणि त्याचे बांधकाम सुरू आहे.

Tags: BMCGokhale Bridgeकन्सल्टन्सी फर्मगोखले पूलमुंबई मनपा
Previous Post

बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर!

Next Post

अंधेरीचा गोखले पूल सोमवारपासून वाहतुकीला बंद झाल्यावर कोणते मार्ग वापराल?

Next Post
Gokhale Bridge (1)

अंधेरीचा गोखले पूल सोमवारपासून वाहतुकीला बंद झाल्यावर कोणते मार्ग वापराल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!