Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरातमधील २०१७ निवडणुकीत गाजलेल्या हार्दिक-जिग्नेशसोबतचे अल्पेश ठाकोर आता कुठे आहेत?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Alpesh Thakor

मुक्तपीठ टीम

यावर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. यावेळेची गुजरात विधानसभा निवडणुक चुरशीची होणार आहे, कारण भाजपा-काँग्रेससोबत आपसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मात्र या सर्वांमध्ये चर्चा होतेय ती २०१७ च्या निवडणुकीची. २०१७ गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला विजय तर मिळालाच पण काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांमुळे काँग्रेसनेही चांगलीच कामगिरी केली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर (जे आता भाजपात आहेत) यांचा २०१७ च्या निवडणुकीच्या कामगिरीत मोठा वाटा आहे. मात्र आता प्रश्न निर्माण झाला आहे तो भाजपात गेलेले अल्पेश ठाकोर आता कुठे आहेत? २०२२ ची निवडणुकी ते लढवणार की नाही याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

अल्पेश ठाकोर आता कुठे आहेत?

  • काँग्रेसच्या तिकिटावर २०१७ ची निवडणूक लढवणारे आणि जिंकणारे अल्पेश ठाकोर कुठे आहे आणि काय करतायत?
  • ओबीसी आंदोलनातून अल्पेश ठाकोर प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
  • त्यांनी सर्वप्रथम दारूबंदीची चळवळ सुरू केली, त्याला जनतेचा पाठिंबाही मिळाला.
  • या दारूबंदी आंदोलनाबद्दल उत्तर गुजरातच्या ठाकोर समाजाने अल्पेशचे भरभरून कौतुक केले होते.

२०१७ च्या निवडणुकीत अल्पेश यांचा मोठा सहभाग…

  • २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अल्पेश यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
  • त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी राहुल गांधी स्वतः गुजरातमध्ये आले होते.
  • २०१७ मध्ये अल्पेश यांनी राधानपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि तिथे पक्षाचा झेंडा फडकवला.
  • निवडणूक जिंकल्यानंतर अल्पेश यांना मंत्रीपद हवे असल्याचेही समोर आले होते.

राधानपूर मतदारसंघातून अल्पेश यांचा पराभव

  • २०१७ मध्ये काँग्रेसला बहुमत न मिळाल्याने अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला.
  • अल्पेश ठाकोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पोटनिवडणूक झाली, त्यानंतर राधनपूर मतदारसंघातून अल्पेश ठाकोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
  • काँग्रेसने रधू देसाईंना उभे केले.
  • या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारात अल्पेश निवडणूक संपल्यानंतर लाल दिव्याच्या वाहनातून येईन, अशी पुनरावृत्ती करत राहिले, मात्र अल्पेशचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही आणि त्यांचा पराभव झाला.

अल्पेश ठाकोर २०२२ निवडणूक लढवू शकतात

  • अल्पेश ठाकोर सध्या समाजाच्या नावावर राजकारण करताना दिसत आहे.
  • अल्पेश यांना ना भाजपाच्या संघटनेत स्थान मिळाले ना पक्षाकडून त्याची कोणतीही बातमी येत आहे.
  • अल्पेश २०२२ मध्ये निवडणूक लढवताना दिसणार असून भाजप त्यांना यात पाठिंबा देऊ शकते, असे मानले जात आहे.

Tags: Alpesh thakorBJPCongressGujrat Assembly Electionअल्पेश ठाकोरकाँग्रेसगुजरात विधानसभाभाजपा
Previous Post

मुंबईत नेत्रविकारांसाठी विशेष रुग्णालय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

शिंदे गटासोबत बाहेरील राज्यांचे शिवसेना पदाधिकारी! पण आयोगाने शिवसेनेच्या संविधानानुसार निर्णय दिला तर काय होणार?

Next Post
Eknath shinde group vs uddhav Thackeray Shivsena

शिंदे गटासोबत बाहेरील राज्यांचे शिवसेना पदाधिकारी! पण आयोगाने शिवसेनेच्या संविधानानुसार निर्णय दिला तर काय होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!