मुक्तपीठ टीम
यावर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. यावेळेची गुजरात विधानसभा निवडणुक चुरशीची होणार आहे, कारण भाजपा-काँग्रेससोबत आपसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मात्र या सर्वांमध्ये चर्चा होतेय ती २०१७ च्या निवडणुकीची. २०१७ गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला विजय तर मिळालाच पण काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांमुळे काँग्रेसनेही चांगलीच कामगिरी केली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर (जे आता भाजपात आहेत) यांचा २०१७ च्या निवडणुकीच्या कामगिरीत मोठा वाटा आहे. मात्र आता प्रश्न निर्माण झाला आहे तो भाजपात गेलेले अल्पेश ठाकोर आता कुठे आहेत? २०२२ ची निवडणुकी ते लढवणार की नाही याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
अल्पेश ठाकोर आता कुठे आहेत?
- काँग्रेसच्या तिकिटावर २०१७ ची निवडणूक लढवणारे आणि जिंकणारे अल्पेश ठाकोर कुठे आहे आणि काय करतायत?
- ओबीसी आंदोलनातून अल्पेश ठाकोर प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
- त्यांनी सर्वप्रथम दारूबंदीची चळवळ सुरू केली, त्याला जनतेचा पाठिंबाही मिळाला.
- या दारूबंदी आंदोलनाबद्दल उत्तर गुजरातच्या ठाकोर समाजाने अल्पेशचे भरभरून कौतुक केले होते.
२०१७ च्या निवडणुकीत अल्पेश यांचा मोठा सहभाग…
- २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अल्पेश यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
- त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी राहुल गांधी स्वतः गुजरातमध्ये आले होते.
- २०१७ मध्ये अल्पेश यांनी राधानपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि तिथे पक्षाचा झेंडा फडकवला.
- निवडणूक जिंकल्यानंतर अल्पेश यांना मंत्रीपद हवे असल्याचेही समोर आले होते.
राधानपूर मतदारसंघातून अल्पेश यांचा पराभव
- २०१७ मध्ये काँग्रेसला बहुमत न मिळाल्याने अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला.
- अल्पेश ठाकोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पोटनिवडणूक झाली, त्यानंतर राधनपूर मतदारसंघातून अल्पेश ठाकोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
- काँग्रेसने रधू देसाईंना उभे केले.
- या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारात अल्पेश निवडणूक संपल्यानंतर लाल दिव्याच्या वाहनातून येईन, अशी पुनरावृत्ती करत राहिले, मात्र अल्पेशचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही आणि त्यांचा पराभव झाला.
अल्पेश ठाकोर २०२२ निवडणूक लढवू शकतात
- अल्पेश ठाकोर सध्या समाजाच्या नावावर राजकारण करताना दिसत आहे.
- अल्पेश यांना ना भाजपाच्या संघटनेत स्थान मिळाले ना पक्षाकडून त्याची कोणतीही बातमी येत आहे.
- अल्पेश २०२२ मध्ये निवडणूक लढवताना दिसणार असून भाजप त्यांना यात पाठिंबा देऊ शकते, असे मानले जात आहे.