Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लसीकरण शंभर कोटीपार! पण मास्कमुक्ती कधी?

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
mask free

मुक्तपीठ टीम

भारतातील लसीकरणाने शंभर कोटी डोसचा मोठा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार होतानाच एका मुद्द्यावर चर्चा सुरु झाली ती म्हणजे आता मास्कपासून मुक्ती कधी मिळणार? कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आता चिरपरिचित झालेल्या रात्री आठच्या प्राइम टाइम वेळेत येऊन प्रथमच दिलासा देणारी घोषणा करणार? मित्रों, अब हमारे देश में मास्क से मुक्ती मिल गई है…आज से…अभी से कोई भी व्यक्ती…चाहे वह कोई भी हो…मास्क नहीं पहनेगा…न ही गमछे से चेहरा ढांकेंगा! अर्थातच चर्चा रंगली असली तरी ती प्रत्यक्षात लवकर येईलच असे नाही. पंतप्रधान मोदी तशी घोषणा करण्यासाठी लसीकरणाचा तो टप्पा एप्रिल २०२२मध्ये किंवा नंतरच येऊ शकतो.

 

जाणकारांच्या मते सध्या गाठलेला शंभर कोटी डोसचा टप्पा हा सिंगल डोसचा आहे. दोन्ही डोस झाल्यानंतर संपूर्ण लसीकरणाला अद्याप वेळ आहे. सध्याच्या गतीनं देशात २१६ कोटी लसींचे डोस मिळण्यासाठी वेळ लागणार आहे.

 

लसीकरणाच्या लक्ष्यसिद्धीनंतर मास्कमुक्ती!

  • आता ८० कोटीवरून १०० कोटींवर जाण्यासाठी ३१ दिवस लागले आहेत.
  • म्हणजेच आता लसीकरणाचा वेग कमी झाला आहे.
  • जर लसीकरण सध्याच्या गतीने सुरू राहिले, तर देशात मास्कमुक्तीसाठी आवश्यक ८५ टक्के लोकसंख्येच्या लसीकरणासाठी किमान सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.
  • त्यानुसार एप्रिल २०२२च्या नंतरच हे लक्ष्य गाठता येऊ शकते.
  • त्यानुसारच मास्कमुक्तीबद्दलचा निर्णय अपेक्षित आहे.
  • त्याआधी मास्कमुक्ती तेव्हाच शक्य होईल जर केवळ भारतातील काही नाही तर सर्व राज्यांमध्ये तसेच जगातील बहुतांश देशांमधून कोरोना संसर्गाचा दर शुन्याकडे जाईल.

कसा गाठला शंभर कोटींचा टप्पा?

  • देशात लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू झाली.
  • सुरुवातीचे २० कोटी डोस देण्यासाठी १३१ दिवस लागले.
  • त्यानंतरचे २० कोटी डोस ५२ दिवसात देण्यात आले.
  • त्यापुढील ६० कोटींचा टप्पा ३९ दिवसात पार केला गेला.
  • त्यानंतर २० कोटी डोस देत ८० कोटींचा टप्पा २४ दिवसात पूर्ण केला गेला.
  • त्यानंतर ३१ दिवसांमध्ये २० कोटी डोस देत शंभर कोटींचा टप्पा आज गाठला गेला.
  • एका अंदाजानुसार, सध्याच्या वेगानुसार लसीकरणाचा २१६ कोटी डोसचा टप्पा गाठण्यासाठी १७५ दिवसांचा कालावधी लागू शकतो.

Tags: coronacorona vaccinevaccination driveकोरोनालसीकरण मोहीम
Previous Post

मुख्यमंत्रीपदावरून राणेंचा वेगळाच ‘प्रहार’, ठाकरेंनी सांगितल्यामुळे पवारांनी सुचवले नाव!

Next Post

केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्ता २८ वरून ३१ टक्क्यांवर!

Next Post
anurag thakur

केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्ता २८ वरून ३१ टक्क्यांवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!