Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जियो, वोडाफोन-आयडिया, एअरटेल 5G सेवा सुरु! BSNLची 5G सेवा कधी?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
5G Network

मुक्तपीठ टीम

देशात ऑक्टोबर २०२२पासून 5G दूरसंचार सेवा सुरू झाली आहे. रिलायन्स जियो आणि एअरटेलनेही देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G दूरसंचार सेवा सुरू केली आहे. आता भारत संचार निगम लिमिटेड देखील लवकरच 5G सेवा सुरू करणार आहे. केंद्रीय दूरसंचार आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

यावर्षी, जियो आणि एअरटेलने 5G सेवा सुरू केली. देशातील निवडक शहरांतून सुरू झालेली ही सेवा हळूहळू संपूर्ण देशात पोहोचवण्याची योजना आहे. अशा वेळी जो प्रश्न मनात येतो तो म्हणजे, सरकारी कंपनी बीएसएनएल 5जी सेवा कधी सुरू करणार?

BSNL 5G टेलिकॉम सर्व्हिसबाबत केंद्रीय दूरसंचार मंत्री काय म्हणाले?

  • केंद्रीय दूरसंचार आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकारी मालकीच्या BSNL चे 4G आधारित तंत्रज्ञान पुढील ५ ते ७ महिन्यांत 5G वर अपडेट केले जाईल.
  • देशातील १.३५ लाख दूरसंचार टॉवर्समध्ये ते सुरू केले जाईल.
  • सीआयआय उद्योग संस्थेच्या एका कार्यक्रमात बोलताना वैष्णव म्हणाले की, स्वदेशी नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी दरवर्षी ५०० कोटी रुपयांवरून ४ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे.

कोटक बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी दूरसंचार क्षेत्रातील बीएसएनएलच्या भूमिकेबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात वैष्णव म्हणाले की, “दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएल खूप मजबूत स्थितीत असेल. बीएसएनएलचे देशभरात सुमारे १,३५,००० मोबाईल टॉवर आहेत. ”

रिलायन्स जियो आणि एअरटेलचे 5G नेटवर्क अनेक शहरांमध्ये रोलआउट

देशात 5G लाँच केल्यानंतर, प्रथम एअरटेल आणि नंतर जियोने देखील देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. एअरटेलने दिल्ली, मुंबई, वाराणसी, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी, कोलकाता, पाटणा आणि गुरुग्राममध्ये 5G सेवा सुरू केली आहे. तर जियोने दिल्ली, मुंबई, पुणे, वाराणसी, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी, कोलकाता, पानिपत, नागपूर, गुरुग्राम आणि गुवाहाटी येथे जियो ट्रू 5G सेवा सुरू केली आहे.


Tags: 5G network5G नेटवर्कairtelBSNLBSNL 5GBSNL Telecom ServiceJIOmuktpeethTelecom ServicesUnion Telecom and Railway Minister Ashwini VaishnavVodafone-Ideaएअरटेलकेंद्रीय दूरसंचार आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवघडलं-बिघडलंजियोदूरसंचार सेवाबीएसएनएलबीएसएनएल 5Gबीएसएनएल टेलिकॉम सर्व्हिसमुक्तपीठवोडाफोन-आयडिया
Previous Post

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस : मानवी अधिकार आणि त्यांच्या रक्षणांचं महत्व मांडणारा दिवस

Next Post

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन…

Next Post
Sulochana Chavan

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!