मुक्तपीठ टीम
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. आतापर्यंत केंद्र सरकार कडून एकूण सात हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. परंतु एप्रिल- जुलै पंतप्रधान किसान योजनेचा आठवा हप्ता अद्याप आलेला नाही.
हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ११ कोटी ७४ लाख लोकांच्या खात्यात ही रक्कम कधी येणार? हा प्रश्न सर्व लाभार्थ्यांच्या मनात आहे. याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती अद्याप देण्यात आले नाही. २ मेनंतर हप्ता येण्याची शक्यता आहे.
Waiting for approval by state म्हणजे काय?
आपण आपल्या मोबाइलवर किंवा कॉम्प्युटरवर स्थिती तपासत असल्यास, तर तिथे आपल्या आठव्या किंवा पुढील हप्त्याबद्दल Waiting for approval by state लिहिले असेल. याचा अर्थ असा की राज्य सरकारने या हप्त्यासाठी आपल्या खात्याला मंजूरी दिलेली नाही, जर एका राज्यात Rft Signed by State Government लिहून येत असेल तर आज आम्ही तुम्हाला Rft Signed by State Government संबंधित माहिती देणार आहोत. चला याचा अर्थ काय ते जाणून घेऊया …
जेव्हा आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी वेबसाइट (https://pmkisan.gov.in/) वर जाता आणि आपला पमेंट स्टेटस चेक करता तेव्हा तुम्हाला भरपूर वेळा Rft Signed by State Government 1st, 2nd,3rd,4th,5th,6th,7th, instalment लिहिलेले दिसते. इथे Rft चा फुलफार्म Request For Transfer आहे. म्हणजेच ‘लाभार्थ्यांचा डेटा राज्य सरकारने तपासला आहे, जो योग्य असल्याचे दिसून आले आहे.’ यानंतर राज्य सरकार केंद्राला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पाठविण्याची विनंती करते.
आठवा हप्ता कुठे अडकला
पंतप्रधान किसान यांचा आठवा हप्ता या महिन्यात यायला पाहिजे, परंतु मोठ्या प्रमाणात झालेल्या गोंधळामुळे राज्य सरकारांना ही खात्री पटली पाहिजे की पैसा योग्य व्यक्तीच्या खात्यात आला आहे. अशा परिस्थितीत लाभार्थ्यांची पडताळणी वेळोवेळी होत आहे. बर्याच राज्यांनी अद्याप Rftवर स्वाक्षरी केलेली नाही. यामुळे हप्ता अडकला आहे.
आठवा हप्ता कधी मिळेल?
राज्य सरकारांनी Rftवर स्वाक्षरी केल्यानंतर केंद्र सरकार एफटीओ जनरेट करते. आपण पाहिले असेलच की हप्ता येतो तेव्हा पीएम किसान पोर्टलवर FTO is Generated and Payment confirmation is pending मेसेज येतो. याचा अर्थ आपला हप्ता लवकरच आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जाईल.