Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रशियाXयुक्रेन युद्ध: शेतकऱ्यांना फायदा, सरकारी हमी दरापेक्षा खासगी खरेदीचा भाव २००ने वाढला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Wheat

मुक्तपीठ टीम

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात जगाच्या अर्थव्यवस्थेचे अनेक प्रकारे नुकसान होत आहे. एकीकडे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर दुसरीकडे गव्हासारख्या अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईचे संकट समोर आले आहे. मात्र, या युद्धाने भारताला फायदा होत आहे. दोन्ही देशांमधील युद्धामुळे जगभरात गव्हाचे भाव सातत्याने वाढत असून आता त्याचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून गव्हासाठी किमान आधारभूत किंमत २ हजार १५ रुपये प्रति क्विंटल आहे, परंतु बाजारात त्याची किंमत २ हजार २५० ते २ हजार ३०० रुपये आहे. सुरुवातीच्या हंगामातच गव्हाचे भाव सरकारी दरापेक्षा जास्त असताना ही परिस्थिती बऱ्याच काळानंतर पाहायला मिळत आहे.

 

यावेळी पंजाब सरकार १० लाख टनापेक्षा कमी गव्हाची खरेदी करत आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे शेतकरी गव्हाच्या पिकाचा काही भाग वाचवतील जेणेकरून भविष्यात ते खासगी व्यापार्‍यांना विकू शकतील असा यामागील सरकारचा विचार आहे. खरे तर युक्रेन युद्धामुळे जगभरात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिकागोमधील फ्युचर्स ट्रेडिंगमध्येही गव्हाच्या किमती ४० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेन हे गव्हाचे प्रमुख निर्यातदार आहेत आणि युद्धामुळे निर्यात ठप्प झाली आहे. अशा स्थितीत मागणी वाढली आहे आणि भारतातही त्याचा परिणाम झाल्याने किमतींनी एमएसपी ओलांडली आहे.


Tags: Black wheatfarmersRussia-Ukraine Warकेंद्र सरकारगहूरशियाXयुक्रेन युद्धशेतकरी
Previous Post

जरंडेश्वर साखर कारखाना जप्तीसाठी ईडीला परवानगी! आता अजित पवारांमागे पुन्हा ईडीपिडा?

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला सरकारकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी!

Next Post
Dadar Chaitya Bhoomi

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला सरकारकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!