मुक्तपीठ टीम
व्हाट्सअॅपवर कोणतेही मजकूर,लिंक, डॉक्युमेंट आणि मेसेज सेव्ह करण्यासाठी आपल्याला ते आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवावे लागते. कारण हे मजकूर,लिंक, डॉक्युमेंट आणि मेसेज आपल्याला गरजेच्यावेळी सहज उपलब्ध होऊ शकतात. हा उपाय आपले मजकूर,लिंक, डॉक्युमेंट आणि मेसेज सेव्ह ठेवण्यासाठी एक सोपा उपाय आहे. परंतु आम्ही तुम्हाला आज यापेक्षाही सोपा उपाय सुचवणार आहोत. आणि या उपायांमुळे तुम्हाला मेसेज कोणालाही पाठवण्याची गरज नाही. या ट्रिकमुळे तुम्ही स्वतःशीच चॅट करू शकता.
व्हाट्सअॅपवर स्वतःशी चॅट करण्याच्या स्टेप
- व्हाट्सअॅपवर स्वतःशी चॅट करण्याच्या पद्धतीसाठी दोन प्रोसेस असतील. त्यातील पहिली प्रोसेस कम्प्युटरवर पूर्ण होईल, तर दुसरी प्रोसेस मोबाईल वर पूर्ण होईल.
- पहिल्या स्टेपमध्ये आपल्या क्रोम ब्राउजरमध्ये जाऊन यूआरएल मध्ये we.me// हे टाईप करून आपला कंट्री कोड (भारत या कंट्रीसाठी ९१) टाईप करून त्यानंतर मोबाईल नंबर टाईप करा.
- त्यानंतर ब्राऊजरमध्ये wa.me//91XXXXXXXXXX अशा पद्धतीने दिसेल,यात Xच्या जागी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाईप करून एंटर करा.
- एंटर केल्यानंतर ब्राऊजरमध्ये डाउनलोड किंवा व्हाट्सअॅप वेब असे लिहिलेले दिसेल.
- व्हाट्सअॅप वेब वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्वतःची चॅट स्क्रीन उघडलेली दिसेल. उघडलेल्या चॅटमध्ये तुम्ही स्वतःला हाय टाईप करून पाठवा. यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये असणाऱ्या व्हाट्सअॅपमध्ये आपले चॅट बॉक्स उघडलेले दिसेल.
व्हाट्सअॅपवर स्वतःचे चॅट बॉक्स कसे बनवावे?
- व्हाट्सअॅपवर स्वतःचे चॅट बॉक्स बनवण्यासाठी तुम्ही मोबाईलचा ही उपयोग करू शकता.
- तुम्हाला फक्त इतर व्यक्ती सोबत एक ग्रुप बनवायचा आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीला चॅटमधून रिमूव्ह करायचे आहे.
- यानंतर ग्रुपमध्ये फक्त तुम्हीच असाल आणि तुम्ही त्या ग्रुपमध्ये स्वतःची मजकूर,लिंक, डॉक्युमेंट आणि मेसेज सेव्ह करू शकता.