मुक्तपीठ टीम
आज व्हॉटसॲप लहानांपासून पासून ते मोठ्यांपर्यंत वापरले जात आहे. पण व्हॉटसॲपवर प्रायव्हसी मेन्टेन करणे गरजचे झाले आहे.काही वेळा लोक आपल्या परवानगीशिवाय आपल्या फोटोचा स्क्रीनशॉट काढतात. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की व्हॉट्सॲपवर आपली लाईफ प्रायव्हेट असावी तर या खास ट्रिकच्या मदतीने तुमचा प्रोफाइल फोटो लपवू शकता.पण जर व्हॉट्सॲपवर प्रोफाइल फोटो ठेवायचा असेल आणि दुसऱ्यांना दाखवायचा नसेल तर या खास ट्रिकचा वापर करा.
व्हॉटसॲपवर असा लपवा तुमचा प्रोफाइल फोटो…
- यासाठी सर्वात आधी व्हॉट्सॲप ओपन करा आणि सेटिंगमध्ये जा.
- अकाउंटवर क्लिक करा आणि मग प्रायव्हसीवर क्लिक करा.
- मग प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- व्हॉट्सॲपवर डिफॉल्ट सेटिंग मध्ये तुमच्या प्रोफाइल फोटोवर एव्हरीवन म्हणजेच सगळ्यांना बघायची परवानगी आहे.
- जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा फोटो फक्त तेच लोक बघतील ज्यांच्या कडे तुमचा फोन नंबर सेव्ह असेल तर तुम्ही सेटिंगला माय काँटॅक्ट मध्ये बदला.
- जर तुम्हाला वाटत असेल की कोणीच बघू नये तर नो वन निवडा. याने व्हॉट्सॲप वर तुमचा फोटो कोणालाही दिसणार नाही.
- एकदा तुमचा प्रोफाइल फोटो लपला गेला, तर जे लोक तुम्हाला मॅसेज करत आहेत त्यांना सुध्दा डीपीमध्ये ग्रे कलरचा फोटो दिसेल.