मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅप सध्याचे संवाद माध्यमातील एक मोठे स्रोत आहे. मेटाचे मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप दररोज नवनवीन फिचर्स आणि अपडेट्स आणत असते. या सुविधा देण्यामागे यूजर्सना सर्वोत्तम अनुभव देण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
आता व्हॉट्सअॅपने पुन्हा त्याच्या डेस्कटॉप अॅप्लिकेशनच्या यूजर्ससाठी एक नवीन फिचर आणले आहे. जे त्यांना त्या ग्रुपचा भाग असलेल्या संपर्काचे नाव टाकून रिसेंट ग्रुट शोधून देईल. हे नवीन फिचर लेटेस्ट स्टेबल व्हॉट्सअॅप डेस्कटॉप व्हर्जनमध्ये आणले जात आहे.
‘या’ फिचरचे महत्त्व काय आहे?
जे लोक शेकडो ग्रुपचे भाग आहेत त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त ठरेल कारण, जेव्हा आपण अनेक ग्रुप्सचा भाग असतो तेव्हा काही ग्रुप्सची नावे विसरतो. अशा परिस्थितीत या ग्रुप्सना शोधणे कठीण होते. या नवीन फिचरमुळे हे ग्रुप शोधणे आता सोपे झाले आहे. तुम्ही त्या ग्रुप्सचा भाग असलेल्या सदस्यांची किंवा संपर्कांची नावे वापरून ग्रुप्स शोधू शकता.
डेस्कटॉपवर ‘हे’ फिचर होणार उपलब्ध!
- हे फीचर व्हॉट्सअॅपच्या २.२२४५.९ आणि त्यावरील डेस्कटॉप व्हर्जनसह येईल.
- व्हॉट्सअॅपचे जगभरात दोन अब्जाहून अधिक यूजर्स आहेत आणि ते सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे.