मुक्तपीठ टीम
जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत आहात तर तुमच्यासाठी एक महत्वाची सावध करणारी बातमी आहे. गेल्या काही आठवड्यापासून पॉप्युलर इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप खूपच चर्चेत आहे. कंपनी आपल्या युजर्संसाठी नवीन नवीन फीचर आणत आहे. मात्र, असे असले तरी अनेक फीचर्स यात मिळत नाहीत, जे व्हॉट्सअॅपच्या प्रतिस्पर्धी अॅपमध्ये मिळतात. यातील काही अॅप हे व्हॉट्सअॅपसोबत असल्याचा आवही आणतात. अशा काही थर्ड पार्टी अॅपचा वापर केल्यास तुमचे व्हॉट्सअॅप खातं बंद केलं जाण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि मोबाइल तपासा.
फँसी फीचर्सने तयार केले जात आहे व्हॉट्सअॅपचे अनधिकृत व्हर्जन
- एका रिपोर्टनुसार, काही डेव्हलपर्स व्हॉट्सअॅपचे अनाधिकृत व्हर्जन बनवत आहे.
- हे अॅप यूजर्सला आवडत असून, अधिकृत व्हॉट्सअॅपवरील चॅट या अॅपमध्ये ट्रांसफर करण्यास सांगितले जात आहे.
- हे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संशयास्पद अॅप्सपैकी एक म्हणजे व्हॉट्सअॅप प्लस.
- साहजिकच, व्हॉट्सअॅप यूजर्सना या अतिरिक्त फीचर्सची गरज भासत असते.
- परंतु ऑफिशियल अॅपवर हे फीचर्स उपलब्ध नसल्याने ते या थर्ड पार्टी अॅपचा वापर करतात.
- जेव्हा व्हॉट्सअॅप अशा खात्यांवर कारवाई करते, तेव्हा ते खातं थेट बॅन करत असते.
- केवळ व्हॉट्सअॅप प्लसच नाही, तर अशाप्रकारचे इतर थर्ड पार्टी अॅप्स वापरणाऱ्या अकाउंट्सवर देखील बंदी घातली जाते.
असुरक्षित अॅपचा प्रायव्हसीलाही धोका!
- अनेक थर्ड पार्टी अॅपद्वारे तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरसचा शिरकाव होऊ शकतो.
- यामुळे तुमची खासगी माहिती धोक्यात येऊ शकते.
- याशिवाय हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध नसतात.
- अशा अॅप्सला इतर वेबसाइटवरून डाउनलोड करावे लागते.
- तसेच, व्हॉट्सअॅपचे अधिकृत व्हर्जन वापरल्याने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुविधा देखील यूजर्सला मिळते.
- यामुळे यूजर्सचे चॅट सुरक्षित व गोपनीय राहते.
- इतर अॅप्समुळे खासगी चॅट लीक होण्याचा देखील धोका असतो.