Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील इतरांच्या पोस्टसाठी अ‍ॅडमिन जबाबदार नसणार! न्यायालयाचा दिलासा! 

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
whatsApp

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चालवणाऱ्या अ‍ॅडमिनसाठी दिलासाची बातमी आहे. यापुढे ग्रुपमधील इतर सदस्याच्या आक्षेपार्ह पोस्टसाठी अ‍ॅडमिनला जबाबदार धरले जाणार नाही. इतकेच नाही तर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनविरूद्धही फौजदारी खटला चालविण्यास परवानगी दिली जाणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधील इतर सदस्यांच्या आक्षेपार्ह पोस्टसाठी ग्रुप अ‍ॅडमिनला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. हा आदेश गेल्या महिन्यात मंजूर झाला होता आणि त्याची प्रत २२ एप्रिल रोजी उपलब्ध झाली होती. या निर्णयासह न्यायालयाने ३३ वर्षीय व्यक्ती विरूद्ध दाखल असलेला लैंगिक छळाचा खटला फेटाळून लावले आहे.

न्यायमूर्ती झेड ए हक आणि न्यायमूर्ती ए.बी. बोरकर यांनी असे सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅपच्या अ‍ॅडमिनकडे केवळ ग्रुपमधील सदस्यांना ग्रुपमध्ये अ‍ॅड करणे किंवा काढून टाकणे हा अधिकार आहे. परंतु ग्रुपमध्ये केलेली कोणतीही पोस्ट किंवा कन्टेंटला नियंत्रित करण्याचा अधिकार त्याला नाही किंवा त्याला थांबविण्याची क्षमताही त्याच्याकडे नाही.

या याचिकेवर निकाल देण्यात आला

  • हा आदेश न्यायालयाने ३३ वर्षीय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन किशोर तरोने यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिला आहे.
  • २०१६ मध्ये तरोने यांच्याविरूद्ध गोंदिया जिल्ह्यातील आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  • त्याच्यावर अश्लील टीका केल्याचा आरोप, त्या महिलांच्या सन्मानाचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला होता.
  • फिर्यादीनुसार तरोने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्यावर कारवाई करण्यात अपयशी ठरला.
  • ज्याने गटातील एका महिला सदस्याविरूद्ध गलिच्छ व अश्लील भाषा वापरली.
  • त्यांनी दाखल केलेला खटला फेटाळून लावण्याची विनंती न्यायालया केली.
  • खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले की, व्हॉट्सअ‍ॅपच्या एखाद्या सदस्याने केलेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनवर खटला चालवला जाऊ शकत नाही.
  • त्यानंतर उच्च न्यायालयाने तारोने यांच्याविरोधात दाखल केलेला एफआयआर आणि त्यानंतर दाखल केलेले आरोपपत्र फेटाळून लावले आहे.

 


Tags: Adminmumbai hight courtnagpur bench of mumbai highcourtwhatsappWhatsApp Groupअ‍ॅडमिननागपूर खंडपीठमुंबई उच्च न्यायालयव्हॉट्सअॅपव्हॉट्सअ‍ॅप ग्रुप
Previous Post

लस मोफतच द्या! कुणालाही लसीविना राहण्याचे निमित्त नको!! ऐपत त्यांनी मुख्यमंत्री निधीला देणगी द्यावी!

Next Post

व्हायरस वॉर! कोरोनाला हटवण्यासाठी साध्या सर्दीचा विषाणू उपयोगी?

Next Post
ryno

व्हायरस वॉर! कोरोनाला हटवण्यासाठी साध्या सर्दीचा विषाणू उपयोगी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!