Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज काय बोलणार ठाकरे? शिंदेंचे बंड, बंडखोरांचे आरोप, कदमांचं पातळी सोडून बोलणं आणि भाजपा…मुद्दे अनेक!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uddhav Thackeray both hands in action

मुक्तपीठ टीम

आज मुंबईतील गोरेगाव परिसरातील नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत झालेली बंडाळी, भाजपा आणि मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

शिवसेनेचा आज गटप्रमुख मेळावा!!

  • शिवसेनेचा दसरा मेळावाही होणार आहे.
  • दसरा मेळाव्याला अद्यापही परवानगी मिळाली नसली तरी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावर शिवसेना ठाम आहे.
  • त्यात आज गोरेगावचे नेस्को संकुलात शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे.
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार आहे.
  • सायंकाळी ठीक ५ वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे.
  • मुंबईतील हजारो गटप्रमुख आणि शिवसैनिकांसह शिवसेनेचे नेते, उपनेते, विभागप्रमुख, लोकप्रतिनिधी आणि अन्य पदाधिकारीही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
  • उद्धव ठाकरे हे आपल्याशी थेट संवाद साधणार असल्याने गटप्रमुखांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे.
  • नेस्को संकुलातील उद्याच्या मेळाव्यापूर्वी शाखा स्तरावर बैठका घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
  • त्यानुसार शिवसेनेच्या शाखांमध्ये बैठका झाल्या आणि कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्यात आली.
  • शिवसैनिकांकडून आजच्या मेळाव्यापूर्वी जोरदार बॅनरबाजी सुरु आहे.

आज काय बोलणार उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे काय बोलणार? शिवसैनिकांना काय संदेश देणार? कोणावर निशाणा साधणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एकनाथ शिंदे यांच्यांसह ४० आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाले. त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा, आमदार, खासदार यांच्यानंतर शिवसैनिकांची देखील गळती आणि मुंबई महापालिकेच्या निवडणूक यावर उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे पाहावे लागणार आहे.


Tags: nesco centerShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेनेस्को संकुलशिवसेनाशिवसेना गटप्रमुख मेळावा
Previous Post

राजू श्रीवास्तव यांचं निधन: ऑटो ड्रायव्हर ते विनोदाचा बादशाह! जीवनही बॉलिवुड चित्रपट कथेसारखाच…

Next Post

विचार करा, पण अतिविचार करणंही घातकच! कशी बदलाल ही सवय?

Next Post
headaches

विचार करा, पण अतिविचार करणंही घातकच! कशी बदलाल ही सवय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!