मुक्तपीठ टीम
आज मुंबईतील गोरेगाव परिसरातील नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत झालेली बंडाळी, भाजपा आणि मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.
शिवसेनेचा आज गटप्रमुख मेळावा!!
- शिवसेनेचा दसरा मेळावाही होणार आहे.
- दसरा मेळाव्याला अद्यापही परवानगी मिळाली नसली तरी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावर शिवसेना ठाम आहे.
- त्यात आज गोरेगावचे नेस्को संकुलात शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार आहे.
- सायंकाळी ठीक ५ वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे.
- मुंबईतील हजारो गटप्रमुख आणि शिवसैनिकांसह शिवसेनेचे नेते, उपनेते, विभागप्रमुख, लोकप्रतिनिधी आणि अन्य पदाधिकारीही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
- उद्धव ठाकरे हे आपल्याशी थेट संवाद साधणार असल्याने गटप्रमुखांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे.
- नेस्को संकुलातील उद्याच्या मेळाव्यापूर्वी शाखा स्तरावर बैठका घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
- त्यानुसार शिवसेनेच्या शाखांमध्ये बैठका झाल्या आणि कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्यात आली.
- शिवसैनिकांकडून आजच्या मेळाव्यापूर्वी जोरदार बॅनरबाजी सुरु आहे.
आज काय बोलणार उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे काय बोलणार? शिवसैनिकांना काय संदेश देणार? कोणावर निशाणा साधणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एकनाथ शिंदे यांच्यांसह ४० आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाले. त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा, आमदार, खासदार यांच्यानंतर शिवसैनिकांची देखील गळती आणि मुंबई महापालिकेच्या निवडणूक यावर उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे पाहावे लागणार आहे.