Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मागासवर्गीय आयोग अहवाल नाकारल्यानं आता पुढे काय होणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court 2

मुक्तपीठ टीम

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. पुढील आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मागासवर्ग आयोगाच्याअहवालावर रिपोर्ट सादर केल्याची तारीख, मात्र अहवालातील आकडेवारी कुठल्या काळातील आहे, हे सरकारलाही माहीत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. यातील सर्वात महत्वाचा प्रश्न असा की या निकालामुळे आता काय घडणार?

 

सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं?

  • ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याबाबात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालानुसार महाराष्ट्र सरकारने आणि निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका घेऊ नये.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होतील.
  • पुढील आदेश येईपर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण नाही.
  • अहवालात देण्यात आलेली राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी देण्यात आलेली नाही.
  • तसेच पुढचे निर्देश येईपर्यंत ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळणार नाही.
  • प्रायोगिक अभ्यास, संशोधनाशिवाय आणि इम्पेरिकल डेटाशिवाय आयोगाने २ आठवड्यांत अहवाल दिला. यामुळे योगाने पुन्हा तथ्यात्मक अहवाल द्यावा.

 

राज्य मागासवर्गाच्या अहवालात नेमकं काय?

  • राज्य सरकारनं ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सहा विभागाचा मिळून एकत्रित डेटा जमा केला आहे.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांचे म्हणजे ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आवश्यक सांख्यिकी राज्य सरकारने तयार ठेवली आहे.
  • राज्य सरकारच्या विविध संस्था आणि शासकीय प्रणालीद्वारे काढलेल्या माहितीनुसार राज्यात ओबीसी समाज ४० टक्के ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३० टक्के तर ओबीसी शेतकऱ्यांचे प्रमाण टक्के असल्याचे सूचवण्यात आले आहे.

Tags: MaharashtraOBC reservationSupreme Courtओबीसी आरक्षणमहाराष्ट्रमागासवर्ग आयोगसर्वोच्च न्यायालय
Previous Post

राज्यपालांनी अर्धवट सोडलेलं पूर्ण भाषण कसं होतं? वाचा सविस्तर…

Next Post

पृथ्वीवर कोरोनानंतर अंतराळात कचरा! चीनचं नवं पाप, आता चंद्राला ताप!

Next Post
Moon

पृथ्वीवर कोरोनानंतर अंतराळात कचरा! चीनचं नवं पाप, आता चंद्राला ताप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!