मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. दोघांमध्ये जवळपास २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. पवारांनी अचानक मोदींची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र या भेटीत काय झालं हे स्वत: शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यांनी तीन मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगतानाच भाजपासोबत जाण्याची शक्यताही फेटाळून लावली.
मुद्दा -१
राज्यपालनियुक्त १२ आमदार
- १२ आमदारांबाबत राज्यपलांनी निर्णय घेतला नाही!
- गेल्या दोन वर्षांपासून १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे.
- राज्यपालांनी त्यावर काहीही निर्णय घेतला नाही.
मुद्दा -२
संजय राऊतांवर कारवाई
- संजय राऊतांवर कारवाईची गरज काय होती? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
- महाराष्ट्रातील कारवायासंदर्भात कोणतीही चर्चा पंतप्रधान मोदींशी झाली नाही.
- फक्त संजय राऊतांच्या कारवाईवरचा मुद्दा पंतप्रधान समोर मांडला आहे.
- संजय राऊतांवर ईडी कारवाई, ते राज्यसभा सदस्य आहेत आणि ते एक पत्रकार आहेत.
- याबाबत मी मोदींना कल्पना दिली आहे.
- तसेच केंद्रीय तपास यंत्रणा जबाबदार आहे.
- राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मोदींना दिला आहे.
- या २ विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, अशी माहिती यावेळी पवारांनी दिली आहे.
राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नाही!
- राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपाच्याविरोधात उभी आहे.
- सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेशी आहे तशी कटुता भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नात्यात नसल्याचं म्हटलं होतं.
- पण दुसऱ्यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नाही, असं पवारांनी स्पष्ट शब्दात बजावलं. मविआ सरकारचं सर्व चागलं आहे.
- भाजपासोबत आमचे कोणते संबंध नाही.
- महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा येणार आहे.
- महाविकास आघाडी सरकारला सध्या कोणताही धोका नाही.
- पुन्हा सत्तेत येऊ, असे म्हणत पवारांनी राज्यातल्या भाजप नेत्यांनाही प्रत्युत्तर दिले आहे.
मुद्दा -३
लक्षद्विपच्या काही मूलभूत सुविधांसाठी पाठपुरवा सुरु! मोहम्मद फैजल
- लक्षद्विपच्या काही मूलभूत सुविधांसाठी पाठपुरावा सुरु आहे. त्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली.
- तेथील ७५ हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहेत. प्रफुल्ल के पटेल यांना लक्षद्विप अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून नेमण्यात आल्यापासून तिथल्या रहिवाशांचे जगणे अवघड झाले आहे. लक्षद्विप प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे काही निर्णय चुकीचे आहेत.