मुक्तपीठ टीम
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. हा दिवस माघ चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी आणि तिलकंड चतुर्थी म्हणूनही ओळखला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. यंदा गणेश चतुर्थी शुक्रवारी ४ फेब्रुवारीला रोजी साजरी होत आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी शिवयोग आणि रवियोगाचा शुभ संयोग तयार होत आहे. या दोन शुभ योगांमध्ये गणेशाची उपासना करणे अत्यंत शुभ मानले जाते. गणेश जयंतीचे धार्मिक महत्त्व आणि पूजेची वेळ जाणून घ्या.
गणेश जयंतीचे शुभ मुहूर्त
- चतुर्थी तिथी शुक्रवार, ४ फेब्रुवारी रोजी पहाटेपासून सुरू झाली आहे,
- शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असेल.
- शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.४१ पर्यंत पुजेचा शुभ मुहूर्त आहे.
- पूजेसाठी एकूण कालावधी २ तास ११ मिनिटांचा आहे.
गणेश जयंतीला दोन शुभ योग
- ज्योतिष्यांच्या मते ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजून ते दुपारी ३ वाजून ५८ मिनिटांपर्यंत रवि योग असेल. यानंतर संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी शिवयोग होईल.
- धार्मिक मान्यतांनुसार रवि आणि शिव योगात केलेल्या कार्याचे फळ अनेक पटीने मिळते.
- गणेश जयंतीनिमित्त शिवयोग घडवणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते.
गणेश जयंतीचे महत्त्व
- या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला असे मानले जाते.
- या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाते.
- अग्नि पुराणानुसार जो व्यक्ती भगवान गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला संकटांपासून मुक्ती मिळते.
- श्रीगणेशाच्या कृपेने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.