मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक सध्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंच्या कथित गैरकारभारावर तुटून पडले आहेत. ते सकाळी ट्विटरवर आरोपांचे संकेत देणारे ट्वीट करतात आणि नंतर पत्रकार परिषदेत खुलासेवार गौप्यस्फोट करतात. मंगळवारी त्यांनी स्पेशल २६ असे ट्वीट केल्याने उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी एनसीबीच्या मुंबई कार्यालयातील एका खास अधिकाऱ्यांचे रॅकेट कार्यरत असल्याचा दावला करत त्यांनी २६ बनावट गुन्हे नोंदवले असल्याचा खळबळजनक आरोप केला.
सकाळी ट्विटरवर स्पेशल २६ असा प्रोमो चालवल्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन सनसनाटी गौप्यस्फोट केले आहेत.
स्पेशल २६ – बनावट गुन्ह्यांचं रॅकेट
- मला एक पत्रं मिळालं आहे.
- एनसीबीच्या अधिकाऱ्याने हे पत्रं पाठवलं. दोन दिवसांपूर्वीच मिळालं.
- त्याची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि डीजी, काँग्रेसच्या अध्यक्षांनाही ही प्रत त्या व्यक्तीने दिले आहे.
- एनसीबीने चौकशी सुरू केली आहे.
त्यांना हे पत्रं पाठवणार. - त्यात २६ प्रकरणांची माहिती दिती दिली आहे.
- त्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहोत.
- एनसीबीच्या कार्यालयात एक ग्रुप तयार झाला आहे.
- खोटे गुन्हे तयार केले जात आहेत.
- प्रामाणिक अधिकाऱ्यांना डावललं जात आहे.
- या प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक गोष्टी उघड होतील.
- एनसीबीने या प्रकरणी चौकशी केली पाहिजे.