Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची ‘सफल’ प्रक्रिया केंद्राला अभ्यास भेट

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narhari jhirwal

मुक्तपीठ टीम 

राज्यातील आदिवासी  शेतकऱ्यांचा शेतमाल आणि वनउपज प्रत्यक्ष रिटेल चेनद्वारे अंतिम वापरकर्त्याला विकण्याच्या उद्देशाने अभ्यास करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिल्लीस्थित ‘मदर डेयरी‘ च्या सफल या फळ व भाजीपाला प्रक्रिया केंद्राला भेट दिली.

              

श्री.झिरवाळ यांनी येथील मंगोलपुरी औद्योगिक क्षेत्रात स्थित सफल फळ व भाजीपाला प्रक्रिया केंद्राला भेट दिली. राज्यातील आदिवासी  शेतकरी  विविध  प्रकारची  फळे व भाजीपाला  यांचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांच्या मालाला उचित दर व बाजारपेठ मिळावी तसेच गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनासाठी त्यांनी मदर डेयरीचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ.ओमविर सिंह यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. सफलकडून  शेतकऱ्यांना करण्यात येणारे मार्गदर्शन आदिंविषयांचीही माहिती घेतली. नाचणीपासून ते स्ट्रॉबेरी, द्राक्षे आदि वैविध्यपूर्ण पीक घेणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचा माल रिटेल चेनद्वारे उपभोक्त्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सफलकडून भविष्यात सहकार्य मिळण्याची अपेक्षाही श्री झिरवाळ यांनी  यावेळी व्यक्त केली.

                  

श्री. झिरवाळ यांनी येथील २२ एकर परिसरात वसलेल्या सफल केंद्राची पाहणी केली. त्यांनी या केंद्रातील मध्यवर्ती  वितरण सुविधा (सीडीएफ) समजून घेतली. येथील वाटाणा प्रक्रिया विभाग, वाटाणा पॅकेजिंग विभाग, शीतगृह, फळ पिकवणी विभाग, डिस्पॅच विभाग तसेच या केंद्राच्या परिसरातील सफल आऊटलेटलाही भेट दिली व याबाबतची यंत्रणा सविस्तररित्या जाणून घेतली.

            

डॉ.ओमविर सिंह यांनी यावेळी सादरीकरण केले. सफल केंद्राच्यावतीने शेतकऱ्यांच्या मालाला देण्यात येणारा उचित दर व ग्राहकांना रास्त दरात उपलब्ध करून देण्यात येणारा गुणवत्तापूर्ण माल आदिंबाबत सविस्तर माहिती  दिली. मंगोलपुरी स्थित सफलचे  बिजनेस हेड विनोद कुमार, युनिट हेड अशोक कुमार, फार्मर डेव्हलपमेंट विभाग प्रमुख डॉ विनीत कथुरिया, विशेष कार्य अधिकारी सर्वश्री राजू नंदकर आणि अजित कसरळीकर, मुकेश भोग उपस्थित होते.


Tags: DR.omveer singhmother dairynarhari jhirwaltribal farmersआदिवासी  शेतकरीडॉ.ओमविर सिंहनरहरी झिरवाळमदर डेयरीसफल प्रक्रिया केंद्र
Previous Post

नवाब मलिकांनी सकाळी ट्वीट केले ते ‘स्पेशल २६’ नेमकं काय?

Next Post

वीज अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रकल्पांनी ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत माहिती सादर करावी

Next Post
power loom

वीज अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रकल्पांनी ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत माहिती सादर करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!