मुक्तपीठ टीम
सेक्सटॉर्शन हे ऑनलाइन ब्लॅकमेलसारखेच असते ज्यामध्ये ब्लॅकमेलर सावजाला कॅमेऱ्यासमोर ऑनलाइन सेक्समध्ये सहभागी होण्यासाठी पटवतो. त्यानंतर सेक्सटॉर्शन म्हणजे एखाद्याच्या वेबकॅमवरून अश्लील चित्रे किंवा व्हिडिओ तयार करणे. त्यानंतर या व्हिडिओ किंवा चित्राच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करणे. यामध्ये व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल येतो. त्या कॉलच्या दुसऱ्या बाजूला एक नग्न महिला असेल जी स्क्रीन रेकॉर्डरद्वारे तुमच्या चेहऱ्याचा व्हिडिओ बनवेल. नंतर व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन तुमच्याकडे पैसे मागितले जातात. हा एक वेगानं वाढणारा धोकादायक गुन्हा आहे. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेणे आणि सावधगिरी बाळगताच, तुम्ही किंवा संपर्कातील कुणी लक्ष्य झाले तर पुढे काय करावं, ते माहित असणं गरजेचे आहे.
ब्लॅकमेलिंगच्या बळीने काय करावे?
- तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा.
- फेक आयडी, फोन नंबरची माहिती सायबर सेलसोबत शेअर करा.
- संपूर्ण प्रकरण पोलिसांना स्पष्टपणे सांगा.
- अशा प्रकरणांमध्ये लवकरात लवकर तक्रार नोंदवणे करा कारण गुन्हेगारांवर कारवाई करणे सोपे जाते.
- पीडितेला प्रथम जवळच्या पोलीस ठाण्यातील सायबर क्राईम सेलमध्ये औपचारिक तक्रार नोंदवावी लागेल.
- अधिकार क्षेत्राकडे दुर्लक्ष करून त्या वेळी उपस्थित असलेल्या कोणत्याही शहरात त्याची नोंदणी केली जाऊ शकते.
इंटरनेटच्या जगात अशी काळजी घ्या…
- लोकांमध्ये या प्रकरणाची फार कमी जागरुकता आहे.
- इंटरनेटवर खूप काळजी घेतली पाहिजे.
- लोक इंटरनेटला हलक्यात घेतात, तसं न करता अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.
- हे असे जग आहे जिथे समोर येणारी व्यक्ती कोणत्या रुपात येते हे कळत नाही.
- मित्राच्या नावाने रिक्वेस्ट येते, पण ती सायबर फ्रॉडमधूनही आलेली असते.
- काही सायबर फ्रॉड मित्राच्या नावाने प्रोफाईल तयार करून तुमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर हा क्राईम सुरू होतो.
ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका
- जर कोणी तुमचा व्हिडिओ बनवला तर तुम्ही गुन्हेगार नाही, व्हिडिओ बनवणारा गुन्हेगार आहे.
- भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम २९२, २९३ आणि २९४ अश्लीलतेशी संबंधित आहेत.
- कलम २९२ नुसार कोणत्याही प्रकारचे अश्लील साहित्य प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
- या कलमाखाली २ वर्षांची शिक्षा आहे.
- तोच गुन्हा दुसऱ्यांदा केल्यास ५ वर्षांचा कारावास आणि दंडही होऊ शकतो.
तुम्ही लक्ष्य होताच तक्रार दाखल करा!!
- दोषींविरुद्ध तक्रारी केल्यास मोठे गुन्हे रोखता येतील.
- जर एखाद्या महिलेचे अश्लील छायाचित्र तिच्या नकळत शेअर केले गेले, तर आयपीसीच्या कलम ३५४सी अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
- इंडेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन कायदा १९८६ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
- आय टी कायदा २०२२ चे कलम ६६ई कोणाच्याही संमतीशिवाय त्यांचे फोटो क्लिक करणे किंवा प्रसारित करणे प्रतिबंधित करते.
- व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड आणि शेअर करण्यासाठी छुपे कॅमेऱ्यांचा वापर करणे हा दंडनीय गुन्हा आहे.
- आय टी कायदा २००० च्या कलम ६७ए अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे.
सायबर गुन्ह्याविरोधात सरकारची पावले…
- महिला आणि मुलांवरील सायबर गुन्ह्यांवर विशेष भर देऊन सरकारने http://www.cybercrime.gov.in हे पोर्टल सुरू केले आहे.
- आर्थिक फसवणुकीचा त्वरित अहवाल देण्यासाठी सिटीझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग आणि मॅनेजमेंट सिस्टम सुरू करण्यात आली आहे.
- तसेच सायबर तक्रारी ऑनलाइन नोंदवण्यासाठी १५५२६० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे.
वाचा:
देशभरात ‘सेक्सटॉर्शन’ टोळ्यांचा ऑनलाईन हैदोस!