Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नॅशनल मोनेटायझेशन पाइपलाइन प्रोग्राम आहे तरी काय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nirmala sitaraman

मुक्तपीठ टीम

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नॅशनल मोनेटायझेशन पाइपलाइन प्रोग्राम (NMPP)सादर केला आहे. या कार्यक्रमाद्वारे केंद्र सरकार सरकारी कंपन्यांमध्ये निर्गुंतवणुकीद्वारे तसेच मालमत्ता वापराचे हक्क देऊन पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी पुरवणार आहे, असा सत्ताधारी भाजपाचा दावा आहे. तर यातून सरकारला सरकारी मालमत्ता उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी वापरायच्या आहेत, असा विरोधकांचा आरोप आहे.

 

सरकारचा हेतू काय आहे?

  • नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन प्रोग्राम (NMPP)अंतर्गत सरकारने निधी मिळवण्यासाठी योग्य मालमत्ता ठरवल्या आहेत.
  • सरकारने सरकारी कंपन्यांच्या मालमत्तांची यादी तयार केली आहे, ज्यातून पुढील काही वर्षांत निधी उभारला जाईल.
  • सरकारने या मालमत्तांसाठी कालमर्यादा निश्चित केली आहे.
  • चालू आर्थिक वर्षात 88 हजार कोटी रुपये आणि पुढील चार वर्षात सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे कमाई करण्याचे लक्ष्य आहे.

 

सरकार महामार्ग आणि रेल्वे विकत आहे का?

  • सरकार या मालमत्ता विकणार असल्याचा आरोप होत आहेत.
  • पण तसे नाही, असा सत्ताधारी पक्षाचा दावा आहे, सरकारची या मालमत्तांवरील मालकी अबाधित राहील.
  • पण त्यांचा वापर करण्याचे अधिकार खासगी कंपन्या किंवा गुंतवणूकदारांना दिले जातील.
  • म्हणजेच सरकार त्याच्याशी संबंधित निर्णय घेऊ शकते, पण त्यांचा वापर करण्याचा अधिकार खासगी कंपन्यांकडे असतील.
  • काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपाची ही योजना त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठीच असल्याचा आरोप केला आहे.
  • वीज, रेल्वे, रस्ते नव्याने उभारणीसाठी प्रचंड निधी आणि कालावधी लागतो.
  • ते आयते वापरण्यास मिळत असतील तर त्यातून उद्योगपतींचाही मोठा फायदा आहे.

 

कोणत्या क्षेत्रातून, किती निधी?

  • या कार्यक्रमात सरकारने ठरवलेल्या ६ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेमध्ये रस्ते सर्वात वर आहेत.
  • बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर (बीओटी) मॉडेलवर हायवे हस्तांतरित करून 1.5 लाख कोटी रुपये उभारण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
  • यानंतर रेल्वेचा क्रमांक आहे. सरकारने रेल्वेमधून 1 लाख 52 हजार कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
  • यानंतर, सरकारला पॉवर सेक्टरच्या ट्रान्समिशन लाईन म्हणजेच पॉवर ग्रीडमधून 45 हजार 200 कोटी रुपये उभे करायचे आहेत.
  • एनटीपीसी, एनएचपीसी किंवा कोल इंडियाच्या जलविद्युत प्रकल्पांमधून सरकारने 39,832 कोटी रुपये उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले आहे.
  • गॅस क्षेत्रात, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) च्या पाईपलाईनवर कमाई करून सुमारे 24,000 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • आयओसीएल आणि एचपीसीएलच्या पाइपलाइनवर कमाई करून 22,000 कोटी रुपयांचे लक्ष्य निश्चित केले आहे.

 

मोनेटायझेशनमधून आलेल्या पैशाचा वापर कसा होणार?

  • दर आठवड्याला आणि दर तीन महिन्यांनी यासाठी बैठका घेतल्या जातील.
  • यातून पैसा गोळा करून तो इतर सार्वजनिक हिताच्या कामांवर खर्च करण्यात येईल.
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 च्या अर्थसंकल्पीय भाषणात मालमत्ता विमुद्रीकरणाला नवीन पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा आर्थिक पर्याय म्हणून वर्णन केले होते.
  • सरकार केवळ निधीचे साधन म्हणून नव्हे तर पायाभूत प्रकल्पांच्या देखभालीसाठी आणि विस्तारासाठी एक उत्तम धोरण म्हणून मालमत्तांच्या वापराचे हक्क देऊन होणाऱ्या कमाईकडे पाहत आहे.

Tags: finance minister nirmala sitharamanNMPPअर्थमंत्री निर्मला सीतारामणएनएचपीसीएनटीपीसीनॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन प्रोग्राममोनेटायझेशन
Previous Post

ठाण्याच्या कल्पिता पिंपळेंशी मुख्यमंत्री बोलले, “तुम्ही लवकर बरे व्हा, कारवाईची जबाबदारी आमची”

Next Post

मुंबई मनपाच्या क्रीडा सुविधांचा खासगीकरणाचा आरोप! आमदार नितेश राणे यांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र!

Next Post
nitish rane

मुंबई मनपाच्या क्रीडा सुविधांचा खासगीकरणाचा आरोप! आमदार नितेश राणे यांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!