Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत पावसाचा यलो अलर्ट! समजून घ्या रंगांनुसार अलर्टचे अर्थ…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
What Is Meaning Of Color vice Alerts know In Marathi

मुक्तपीठ टीम

मुंबईसह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस मंगळवारी दिवसभर अविश्रांत बरसला. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज जारी केला आहे. पुढील काही दिवसांत ठाणे जिल्ह्यातही मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा आयएमडीने दिला आहे.हवामान खात्याकडून मुंबई आणि ठाण्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांत विविध ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अशात समजून घ्या रंगांनुसार अलर्ट असतो तरी काय?

रंगांनुसार अलर्ट असतो तरी काय?

खरंतर, हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी आयएमडीकडून चार रंगाचा कोड म्हणून वापर केला जातो. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, यलो आणि रेड अशा रंगाचा वापर होतो.

ग्रीन अलर्ट

  • पावसाळ्यात संबंधित शहरांमध्ये पावसाची परीस्थिती सामान्य असेल, त्यावेळी अनेक भागांमध्ये ग्रीन अलर्ट असतो.
  • यावेळी कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते.

यलो अलर्ट

  • हवामान खात्याकडून अनेक शहरांना यलो अलर्ट जारी केला जातो.
  • यामध्ये, संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे.
  • त्यामुळे सगळ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात.

ऑरेंज कलर

  • मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो.
  • अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.
  • अशावेळी नागरिकांनाही गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात.

रेड अलर्ट

  • जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो.
  • त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतर्क

  • भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतर्क आले आहेत.
  • त्यांनी राज्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आणि जीवित व वित्तहानी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
  • मुंबई शहराजवळ असलेल्या रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने चिंता वाढली आहे.
  • मुंबई आणि आजूबाजूच्या काही जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला आणि काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.

जाणून घ्या कुठे कोणता अलर्ट?

  • आयएमडीने दक्षिण कोकण आणि गोव्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
  • या भागात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे
  • उत्तर कोकण, उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
  • आयएमडीनुसार, मराठवाड्यात वादळ, विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस यासह ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Tags: MansoonmumbaiNews To UseYellow Alertउपयोगी बातमीपावसाळामुंबईयलो अलर्ट
Previous Post

राजकीय ‘महा’गदारोळात मनसे काय करत होती?

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी महापूजेचे निमंत्रण

Next Post
आषाढीच्या महापुजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी महापूजेचे निमंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!