मुक्तपीठ टीम
जियो ग्लास हे एक स्मार्ट डिव्हाइस आहे, जे गेमिंग आणि मनोरंजन तसेच शिक्षणासाठी वापरले जाऊ शकते.
- जियो ग्लास बाहेरून सामान्य गॉगल्ससारखा दिसतो.
- हा ग्लास स्मार्टफोन आणि टॅब्लेटसारख्या स्मार्ट डिव्हाइशी सहजपणे जोडले जाऊ शकतो.
- जियो ग्लासच्या मदतीने व्हिडिओ स्ट्रीमिंगही करू शकता.
- किंवा ग्लास 2D तसेच 3D व्हिज्युअलला समर्थन देतात.
- यामध्ये (१९२०X १०८० पिक्सेल) रिझोल्युशनपर्यंतचे व्हिडिओ प्ले करता येतील.
- ग्लाससह ऑडिओसाठी एक इन-बिल्ट स्पीकर देखील आहे.
जियो ग्लासला कंट्रोलरचा सपोर्टही आहे.
- जियो ग्लासच्या मदतीने कंटेंटला ५० डिग्रीच्या व्ह्यूच्या फील्डमध्ये पाहता येईल.
- जियो ग्लासच्यासोबत कंट्रोलरचा सपोर्ट देखील उपलब्ध आहे.
- कंट्रोलरच्या मदतीने त्याची ब्राइटनेस देखील नियंत्रित केली जाऊ शकते.
- जियो ग्लास होलोग्राफिक सामग्री आणि सामान्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा अनुभव देखील वाढवू शकतो.
शिक्षणासाठीही जियो ग्लास उपयोगी ठरणार आहे.
- जियो ग्लासच्या मदतीने शिक्षणात आणखी सुधारणा करता येईल, असा जियोचा दावा आहे.
- हा ग्लास घातल्याने, विद्यार्थी 2D आणि 3D व्हिज्युअलसह विषय अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील.
- कंपनीने या डिव्हाईसच्या उपलब्धतेबाबत माहिती दिलेली नाही.
- लवकरच ते डिव्हाईस बाजारात येण्याची शक्यता आहे.
एकूणच बदलत्या काळाला साजेशा 5Gचा स्पीड आमच्या काय उपयोगाचा, असं ज्यांना वाटत असेल त्या सर्वांसाठी 5G ग्लास हे एक चांगलं उत्तर ठरण्याची शक्यता आहे. दृष्टीच बदलून टाकणारं!