मुक्तपीठ टीम
देशात १ ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू झाली आहे. 5G कनेक्टिव्हिटीचा केवळ मानवांनाच फायदा होणार असं नाही, तर प्राण्यांची काळजी घेण्यातही मदत होणार आहे. जियो नेहमी नवनवीन उपकरणाने सादर करत असते. आता जियोच्या या नवीन उपकरणामुळे प्राण्यांची काळजी घेणे शक्य होणार आहे.
गायींसाठी डिझाइन केलेले जियोचे ‘कॅटल ट्रॅकर’
- जियोने इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये असेच एक उपकरण सादर केले आहे, जे गायींच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करेल.
- या उपकरणाचे नाव ‘कॅटल ट्रॅकर’ असे ठेवण्यात आले आहे.
- हे उपकरण फक्त गायींसाठी डिझाइन केलेले आहे.
- जियो कॅटल ट्रॅकरची किंमत ४,००० रुपये आहे. मात्र, सध्या ते २,५०० रुपयांनी खरेदी करता येईल.
जियो गौ समृद्धी
- हे ट्रॅकिंग डिव्हाइस जियो गौ समृद्धी अॅपसह सहजपणे कनेक्ट केले जाऊ शकते.
- या अॅपच्या मदतीने गायींच्या आरोग्याची स्थितीही पाहता येईल.
- अँड्रॉइड युर्जससाठी हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.
- हे अॅप आणि डिव्हाइस 5G सोबत 4G नेटवर्कशी देखील कनेक्ट केले जाऊ शकते.
कशा प्रकारे काम करतो कॅटल ट्रॅकर?
- हे उपकरण गायीच्या गळ्यात लावले जाऊ शकते.
- त्यानंतर गायीच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात होते.
- गाईची तब्येत बिघडण्याआधीच हा कॅटल ट्रॅकर तुम्हाला त्याची माहिती देतो.
- हे उपकरण गायींचे दुःख समजते आणि त्यांच्या आरोग्याचाही मागोवा घेते.