Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सध्या मुंबई, कोकणातील वातावरण बिघडवणारे धुळीचे वादळ नेमकं काय असतं? त्याचे आरोग्य, इतर दुष्परिणाम कोणते?

January 24, 2022
in featured, आरोग्य, निसर्ग
0
mumbai duts

मुक्तपीठ टीम

मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये जाणवत असलेले धुरकट वातावरण हे पाकिस्तानातील बलुचीस्तानात उसळलेल्या धुळीच्या वादळामुळे आहे. गुजरात आणि उत्तर भारतात नेहमी फटका देणारे हे धुळीचे वादळ आता मुंबईतील हवामानावरही परिणाम घडवत आहे. महामुंबई परिसरातील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. त्याचे कारण तेथे उसळलेल्या धुळीच्या वादळामुळे आपल्या भागात धुळीचे वारे सुटले आहेत.

 

हवा गुणवत्ता खालावली

  • मुंबई, कोकण पट्ट्यात गेले काही दिवस सकाळपासूनच ढगाळ वातावरण असते.
  • आता पुण्यातही तसे वातावरण असल्याचे कळते.
  • अनेक ठिकाणी धुरकट वातावरण आहे.
  • मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावत आहे.
  • मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक १८० वर आहे.
  • मालाड आणि माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० पार झाला आहे.
  • दोन्ही ठिकाणी हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत पोहचली आहे.

धुळीचे वादळ म्हणजे नेमकं काय?

  • मोठ्या प्रमाणात धूलिकण किंवा वालुकाकण भूपृष्ठावरून हवेत बऱ्याच उंचीपर्यंत फेकले जातात, तेव्हा धुळीचे वादळ तयार होते.
  • धुळीच्या वादळांमध्ये वाऱ्यांबरोबर मुख्यतः वेगाने वाहत जाणारी धूळ काही वेळा वाळू यांचा समावेश असतो.
    वाळवंटे किंवा अन्य ओसाड अर्धशुष्क प्रदेशांच्या विस्तीर्ण क्षेत्रावर अशी वादळं नेहमीच तयार होतात.
  • तेथून ती सभोतालच्या प्रदेशांमध्येही जात असतात.
  • आता मुंबई, कोकणपट्टीवर आलेले धुळीचे वादळ हे पाकिस्तानातील बलुचीस्तान या शुष्क प्रदेशात तयार झालेले आहे.
  • जगभरात उ. अमेरिका, सहारा, ईजिप्त, अरेबिया, इराक, इराण, पाकिस्तान, थरचे वाळवंट, उत्तर भारत, चीन, गोबीचे वाळवंट, ऑस्ट्रेलिया इ. प्रदेशांवर ही वादळे निर्माण होतात.

 

धुळीच्या वादळाचे दुष्पपरिणाम काय?

  • धुळीच्या वादळांचा फार मोठ्या क्षेत्रावर प्रभाव पडतो.
  • धुळी वादळांमुळे भुसभुशीत जमिनीची फार मोठ्या प्रमाणावर धूप होते व नको त्या ठिकाणी धुळीचे थर जमा होतात.
  • अनेकदा धुळीच्या वादळांमुळे काही विशिष्ट भूप्रदेशांवर कित्येक टन धुळही जावून पडते. तसे अमेरिका, युरोपात झाले होते.
  • दाट धुळीच्या वादळात दृश्यमानता इतकी कमी होते की, ५ मीटरपेक्षा दूर अंतरावरच्या वस्तूसुद्धा स्पष्ट दिसत नाहीत.
  • या वादळामुळे अस्वस्थता येते, वातवरणीय दृश्यमानता मंदावते आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होतात.
  • विमान वाहतुकीला तर धुळीची वादळे अत्यंत धोक्याची असतात.

 

धुळीच्या वादळाचे आरोग्यावरही दुष्परिणाम

  • ही धुळीची वादळे आरोग्याच्या दृष्टीनेही अपायकारक असतात.
  • धुळीचे दाट झोत हवेत फेकले गेल्यामुळे व वातावरणात धूलिकण दीर्घकालापर्यंत राहिल्यामुळे विस्तीर्ण भूपृष्ठावर येणाऱ्या सौर प्रारणात (तरंगरूपी ऊर्जेत) घट होते.
  • हजारो चौ.किमी. क्षेत्रातील हवामानावर त्यामुळे परिणाम होऊ शकतो.

 

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोष


Tags: dutsmumbaiPakistanधुळपाकिस्तानमुंबईवादळ
Previous Post

ठाणे – दिवा जलद मार्गासाठी १४ तासांचा मेगा ब्लॉक यशस्वी एमआरव्हीसीची नियोजित कामे पूर्ण

Next Post

“ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” उपक्रम; जयंत पाटील यांनी केले कौतुक!

Next Post
Jayant Patil appreciated the portrait exhibition of painter Nitin Khilare

"ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.." उपक्रम; जयंत पाटील यांनी केले कौतुक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!