Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाणे – दिवा जलद मार्गासाठी १४ तासांचा मेगा ब्लॉक यशस्वी एमआरव्हीसीची नियोजित कामे पूर्ण

January 24, 2022
in घडलं-बिघडलं
0
Thane Diva 14-hour mega block by MRVC started on time

मुक्तपीठ टीम

ठाणे आणि दिवा दरम्यान डाऊन जलद मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक कायमस्वरूपी चालवण्यासाठी रविवारी “एमआरव्हीसी” ने आयोजिलेला १४ तासांचा मेगा ब्लॉक वेळेवर सुरू झाला आणि सर्व नियोजित कामे तपशीलवार पूर्ण करण्यात आली.
Thane Diva 14-hour mega block by MRVC started on time
२३ जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर पहाटे  १.२० वाजता  नियुक्त ‘डीएन थ्रू लाइन’ सुरू करण्यासाठी एमआरव्हीसीचे अभियंता, अधिकारी व अनेक कर्मचारी रात्रभर झटत होते. ठाणे आणि दिवा येथे रेल्वेचे स्लीइंग आणि पार्श्व स्लीइंग कापून ते पुन्हा जोडणे , ठाणे आणि दिवा येथे नवीन मार्गाचा समावेश करणे आणि ट्रॅक टॅम्पिंगनंतर ती सुरू करणे,
Thane Diva 14-hour mega block by MRVC started on time
ठाणे आणि दिवा येथे गाड्यांना वीजपुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरचे (ओएचई ) वायरिंग, क्रॉस स्प्लिसिंग, प्रोफाइलिंग आणि रिडंडंट वायर काढून टाकणे/काढणे यासह क्रॉसओवर/स्लिव्हड भागावर काम करणे ही महत्वाची कामे करण्यात आली.
शिवाय, ठाणे आणि दिवा येथे आरआरआय पॅनेलमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आणि सध्याच्या गीअर्ससह, नव्याने बसवलेल्या  गीअर्सचे इंटरलॉकिंग सुनिश्चित करण्यात आले आहे. जेणेकरून सिग्नलिंग यंत्रणा सुरुवात होईल.
एमआरव्हीसीचे अध्यक्ष/     व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल, संचालक (प्रकल्प) विजय नाथावत, विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी (एचओडी) आणि एमआरव्हीसीचे इतर अधिकारी व कर्मचारी, मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक (डीआरएम)/ एडीआरएम यांच्यासह त्यांचे अधिकारी/कर्मचारी यांचाही समावेश होता. या सर्वांनी ‘साइट’ वर नियंत्रण आणि विविध खात्यांकडून  कामाचे समन्वय साधणे या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
Thane Diva 14-hour mega block by MRVC started on time
कामाच्यास्थळी ४ जेसीबी , ४टॉवर वॅगन, एक हॉपर रेक, ३ टँपिंग मशीन आणि अंदाजे ५०० मजूर ठाणे आणि दिवा दरम्यान नियुक्त केलेल्या ‘डाऊन थ्रू’  मार्गावर  गुंतले होते. मुंबईकडे येणाऱ्या ‘अप थ्रू’ मार्गावर ५ व्या आणि ६ व्या लाईनवर एमआरव्हीसी  आणि मध्य रेल्वेचे अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. आगामी संरेखनासाठी ७२  तासांचा पुढील ब्लॉक ४ फेब्रुवारी ते ६  फेब्रुवारी २२ दरम्यान होणार आहे, असे ‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड’चे मुख्य  जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी ‘मुक्तपीठ’ ला सांगितले.
Thane Diva 14-hour mega block by MRVC started on time

Tags: Central Railwaydivamega blockMRVCthaneएमआरव्हीसीठाणेदिवामेगा ब्लॉक
Previous Post

‘स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान’ या विषयावर २५ जानेवारी रोजी वेबिनार

Next Post

सध्या मुंबई, कोकणातील वातावरण बिघडवणारे धुळीचे वादळ नेमकं काय असतं? त्याचे आरोग्य, इतर दुष्परिणाम कोणते?

Next Post
mumbai duts

सध्या मुंबई, कोकणातील वातावरण बिघडवणारे धुळीचे वादळ नेमकं काय असतं? त्याचे आरोग्य, इतर दुष्परिणाम कोणते?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!