Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीमेवर चीनी सैनिकांशी भारतीय जवानांचा संघर्षावर काय म्हणाले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
rajnath-singh-

मुक्तपीठ टीम

९ डिसेंबर २०२२ रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये आपल्या सीमेवर घडलेल्या घटनेबद्दल मला या सन्माननीय सदनाला माहिती द्यायची आहे.

९ डिसेंबर २०२२ रोजी, पीएलएच्या सैनिकांनी  तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे  उल्लंघन करत तेथील स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला.चीनच्या या प्रयत्नांचा आपल्या लष्कराने  खंबीरपणे आणि दृढतेने सामना केला. त्यानंतर दोन्ही सैन्यांमध्ये समोरासमोर शारीरिक झटापट  झाली मात्र भारतीय लष्कराने शौर्य दाखवत  पीएलए ला आपल्या हद्दीत घुसखोरी करण्यापासून  रोखले आणि त्यांना त्यांच्या चौक्यांवर  परत जाण्यास भाग पाडले. या झटापटीत दोन्ही बाजूचे काही जवान जखमी झाले. मी या सदनाला सांगू इच्छितो की, आपल्या  बाजूला जीवितहानी किंवा कोणताही जवान गंभीर जखमी झालेला  नाही.

भारतीय लष्करी कमांडर्सनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पीएलएचे सैनिक आपल्या ठिकाणी परत गेले. या घटनेचा पाठपुरावा करत, ११ डिसेंबर २०२२ रोजी या भागातील स्थानिक कमांडरने प्रस्थापित व्यवस्थेनुसार , त्यांच्या चिनी  समकक्षांसोबत ध्वज बैठक घेतली आणि  या घटनेसंदर्भात  चर्चा केली. चीनला अशा कृती टाळण्यास तसेच सीमेवर शांतता आणि स्थैर्य  राखण्यास सांगण्यात आले. मुत्त्सदेगिरीच्या  माध्यमातूनही हा मुद्दा चीनकडे उपस्थित करण्यात आला आहे.

मी या सदनाला आश्वस्त करू इच्छितो कि, आपले लष्कर आपल्या  प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि या विरोधातील  कोणतेही  प्रयत्न निष्फळ ठरवण्यासाठी सदैव तत्पर आहे.  मला विश्वास आहे की, हे संपूर्ण सदन आपल्या जवानांच्या  शौर्यपूर्ण  प्रयत्नांमध्ये  त्यांना एकमुखाने पाठबळ  देण्यासाठी उभे राहील. जय हिंद !”


Tags: chinaDefense Minister Rajnath SinghIndiaIndia China ClashIndia China Warसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह
Previous Post

जातीनुसार जनगणना : बिहारमध्ये ७ जानेवारीपासून सुरुवात! नेमकी कशी असणार?

Next Post

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १९ डिसेंबरपासून

Next Post
Nagpur Vichan Bhavan

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १९ डिसेंबरपासून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!