Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एटीएममधून पैसे काढण्याच्या नियम बदलांवर संसदेत चर्चा, कसे आणि किती एटीएम व्यवहार करू शकता?

अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांनी काय दिली माहिती?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bhagwat karad

मुक्तपीठ टीम

एटीएममधून पैसे काढणाऱ्यासाठी एका महत्वाची बातमी आहे. १ जानेवारी २०२२ पासून तसं करण्याच्या नियमात बदल होणार आहेत. आता रिझर्व्ह बँकेने बँकांना एटीएम शुल्क म्हणून ग्राहकांकडून २१ रुपये घेण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत एटीएम व्यवहारासंदर्भातील नियमांबाबतच्या प्रश्नांच्या उत्तरात एटीएमबद्दलची माहिती दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएमशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल करत जवळपास ९ वर्षांनंतर एटीएम व्यवहारांसाठी इंटरचेंज फी वाढवण्यास परवानगी दिली आहे. सध्या बँकांना यासाठी जास्तीत जास्त २० रुपये घेण्याची परवानगी आहे.

किती वेळा विनामूल्य एटीएम व्यवहार करू शकता?

  • ज्या बँकेचे आपण ग्राहक आहात, त्या बँकेच्या एटीएममधून दरमहा ५ वेळा पैसे काढू शकाल.
  • आपण आपल्याला पाहिजे तितक्या वेळा पैसे काढण्याव्यतिरिक्तचे व्यवहार एटीएमच्या माध्यमातून करू शकाल.
  • इतर बँकांच्या एटीएमच्या वापरावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. आता रोकड आणि इतर व्यवहार फक्त ३ ते ५ वेळा करु शकाल.
  • दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई यांसारख्या मेट्रो शहरे इतर बँकांच्या एटीएममधून ३ वेळा पैसे काढू शकतात. त्यात रोख काढण्याव्यतिरिक्तचे इतर व्यवहारही मोजले जातील.
  • महानगरांव्यतिरिक्त देशभर इतर बँकांच्या एटीएमचा ५ वेळा वापर करणे शक्य असेल. त्यात रोख काढण्याव्यतिरिक्तचे व्यवहारही मोजले जातील.

Tags: atmbhagwat karadRBIएटीएमभागवत कराडरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Previous Post

पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next Post

“भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन, कायमस्वरुपी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच!” – अजित पवार

Next Post
Ajit pawar

"भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन, कायमस्वरुपी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच!" - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!