मुक्तपीठ टीम
एटीएममधून पैसे काढणाऱ्यासाठी एका महत्वाची बातमी आहे. १ जानेवारी २०२२ पासून तसं करण्याच्या नियमात बदल होणार आहेत. आता रिझर्व्ह बँकेने बँकांना एटीएम शुल्क म्हणून ग्राहकांकडून २१ रुपये घेण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत एटीएम व्यवहारासंदर्भातील नियमांबाबतच्या प्रश्नांच्या उत्तरात एटीएमबद्दलची माहिती दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएमशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल करत जवळपास ९ वर्षांनंतर एटीएम व्यवहारांसाठी इंटरचेंज फी वाढवण्यास परवानगी दिली आहे. सध्या बँकांना यासाठी जास्तीत जास्त २० रुपये घेण्याची परवानगी आहे.
किती वेळा विनामूल्य एटीएम व्यवहार करू शकता?
- ज्या बँकेचे आपण ग्राहक आहात, त्या बँकेच्या एटीएममधून दरमहा ५ वेळा पैसे काढू शकाल.
- आपण आपल्याला पाहिजे तितक्या वेळा पैसे काढण्याव्यतिरिक्तचे व्यवहार एटीएमच्या माध्यमातून करू शकाल.
- इतर बँकांच्या एटीएमच्या वापरावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. आता रोकड आणि इतर व्यवहार फक्त ३ ते ५ वेळा करु शकाल.
- दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई यांसारख्या मेट्रो शहरे इतर बँकांच्या एटीएममधून ३ वेळा पैसे काढू शकतात. त्यात रोख काढण्याव्यतिरिक्तचे इतर व्यवहारही मोजले जातील.
- महानगरांव्यतिरिक्त देशभर इतर बँकांच्या एटीएमचा ५ वेळा वापर करणे शक्य असेल. त्यात रोख काढण्याव्यतिरिक्तचे व्यवहारही मोजले जातील.