Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंधेरी विधानसभा मतदारसंघ परिसरात १ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजेपासून निर्बंध

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Andheri Election

मुक्तपीठ टीम

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवार १ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंध देखील लागू होत आहेत; या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश अंधेरी पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिले आहेत.

येत्या ३ नोव्हेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार व आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तास आधीपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर पासून प्रचार, प्रसार व जाहिरात याबाबत असणारे निर्बंध आणि घ्यावयाची दक्षता याबाबत सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षणादरम्यान माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबंधितांनी काटेकोरपणे काळजी घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. तसेच या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांविरोधात संबंधित कायदा व नियमांन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी कळविले आहे.

महत्त्वाची माहिती

  • या ४८ तासांच्या कालावधी दरम्यान उमेदवारांना त्यांच्या प्रचार व प्रसार साहित्यासाठी,तसेच जाहिरातीसाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तरी याबाबत संबंधित उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाशी किंवा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा व विहित निर्देशांनुसार कार्यवाही करुन पूर्वपरवानगी प्राप्त करून घ्यावी.
  • आदर्श आचारसंहितेबाबतची नियमपुस्तिका (मार्च २०१९) मधील मार्गदर्शक सूचना क्रमांक ८.१ ते ८.६ अन्वये प्रचार साहित्याबाबत देण्यात आलेल्या निर्देशांनुसार;तसेच ‘लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१’ च्या कलम ‘१२७ क’  नुसार असे कोणतेही निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक मुद्रित किंवा प्रसिद्ध करू शकत नाही, ज्यावर दर्शनी बाजूस मुद्रकांची आणि प्रकाशकांची नावे आणि प्रतींची संख्या व पत्ते नसतील. त्याचबरोबर मुद्रकाने मुद्रित साहित्याच्या चार प्रती व मुद्रित प्रतींची संख्या दर्शवणारे वर्णन पत्र आणि प्रकाशकाकडून वसूल केलेला मुद्रणाचा खर्च यासह संबंधित प्रतिज्ञापत्राची एक प्रत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणे आवश्यक आहे.
  • वृत्तपत्रातील जाहिरातींचे पूर्वोक्त पूर्व – प्रमाणन हे मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या आदल्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या उद्देश असलेल्या अशा सर्व जाहिरातींच्या संबंधात आवश्यक.
  • राजकीय स्वरूपाच्या नभोवाणी,दूरचित्रवाणी आणि केबल टिव्हीवरील जाहिरातींचे पूर्व प्रमाणन आवश्यक.
  • निर्बंध कालावधी दरम्यान मद्यविक्री दुकाने व तत्सम बाबीं येथील व्यवहार,खरेदी-विक्री, देवाणघेवाण इत्यादींवर पूर्णतः निर्बंध.
  • शासकीय विश्रामगृहांमध्ये आणि सार्वजनिक उपक्रमांच्या विश्रामगृहांमध्ये’झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या राजकीय व्यक्तींना संबंधित नियम व पद्धतींच्या अधीन राहून निवास करता येईल. तथापि, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची राजकीय बाबी वा कार्यवाही करण्यावर निर्बंध.
  • धार्मिक स्थळांचा राजकीय वापर करण्यावर निर्बंध.
  • आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारच्या कोणत्याही माहितीचे आदान-प्रदान करण्यास किंवा पाठविण्यावर निर्बंध.
  • ‘बल्क’पद्धतीने पाठवण्यात येणाऱ्या लघु संदेशांवर (एस.एम.एस.) निर्बंध.
  • ध्वनीक्षेपकांच्या वापरावर निर्बंध.
  • कोणत्याही प्रकारची सभा,जाहीर सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यावर निर्बंध.
  • मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या परिसरात उमेदवारांचे तात्पुरते कार्यालय,संपर्क ठिकाण उभारण्यावर निर्बंध.
  • ओपिनियन पोल,सर्वेक्षण इत्यादी बाबी करण्यावर निर्बंध.

अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी ‘अंधेरी पूर्व’ मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी चौधरी यांनी यानिमित्ताने आवर्जून केले आहे.


Tags: AndheriAndheri Bypoll Electionsअंधेरी विधानसभा मतदारसंघपोटनिवडणुकमुंबई उपनगर जिल्हा
Previous Post

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कसं असावं जेवण?

Next Post

कापूस आणि धान खरेदी केंद्रांसाठी नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Next Post
Nana Patole And Eknath Shinde

कापूस आणि धान खरेदी केंद्रांसाठी नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!