मुक्तपीठ टीम
मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील जुहू समुद्रात पोहायला गेलेले चार तरुण वाहून गेल्याची माहिती समोर आली. त्यातील एका तरुणाला जीवरक्षकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. परंतु उर्वरित तीनही तरुण बेपत्ता असल्याने मुंबई अग्निशमन दलाचे जवान व नौदलाच्या पथकामार्फत रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. खरंतर मुंबईतील जुहूसारख्या किनाऱ्यांवर लोक मजेसाठी जातात, पण प्रत्यक्षात काही वेळा काहींच्या चुका जीवघेण्या ठरतात. त्यामुळेच या किनाऱ्यांवर नेमका धोका कोणता असतो, पर्यटक का बुडतात आणि कशी काळजी घ्यावी, हे समजवण्याचा हा एक प्रयत्न…
पाण्याचा अंदाज आला नसल्याने चौघेही खोल पाण्यात वाहून गेले!
- अमन सिंह (२१), कौस्तुभ गुप्ता (१८), प्रथम गुप्ता (१६) व अभिषेक शर्मा (१८) असे या चार तरुणांची नावं आहेत.
- चौघेही महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- चौघेही दुपारी तीनच्या सुमारास जुहू तारा रोड येथील टुलीप हॉटेलच्या शेजारी असलेल्या मार्गिकेतून चौपाटीवर पोहोचले.
- त्यावेळी ओहोटी असल्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.
- समुद्रात दूर पोहायला गेले.
- भरतीच्या वेळी एका मोठ्या लाटेसोबत चौघेही खोल पाण्यात वाहून गेले.
- रिझवान खान (२३) या तरुणाचा ही पाण्यात बुडल्याने मृत्यू झालेला. तो राहणारा गोवंडीचा होता.
जुहूच्या समुद्रात तीन तरुण बुडाले!
- त्यातील शर्मा कसातरी पोहत किनाऱ्याजवळ आला.
- त्यानंतर जीवरक्षकाच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
- इतर तरुणांच्या शोधासाठी तटरक्षक दल व अग्निशमन दलाचे जवानांनी विशेष मोहीम राबवली.
- यावेळी हेलिकॉप्टरच्या मदतीनेही या तरुणांचा शोध घेण्यात आला, पण त्यांचा पत्ता लागला नाही,असे पोलिसांनी सांगितले.
समुद्र किनाऱ्यावर नेमका धोका कोणता?
- सर्व समुद्र किनारे सारखे नसतात.
- काही ठिकाणी समुद्रात किनाऱ्यापासून काही अंतरावर खडक असतात.
- काही किनाऱ्यांपासून काही अंतरावर खड्डे असता. ते जास्त धोकादायक असतात.
- लाट येते तेव्हा ते वाळूने भरतात, लाट परतताना वाळू निघते. तेथे कोणी गेलं तर खड्ड्यात अडकू शकते. जाणारी लाट वर वाळू लोटू शकते.
- समुद्राला ओहोटी येते, त्यानंतर भरती येण्यापूर्वी जर कोणी माहितगार नसलेली व्यक्ती आत खोलवर गेलू तर अचानक वाढलेल्या पाण्यामुळे किनाऱ्यावर परतणं अवघड जातं.
- काही वेळा पावसात जीवनरक्षकांची फौज कमी असते.
- तिथे येणाऱ्या नागरिकांचेही दुर्लक्ष असते.
समुद्र किनाऱ्यावर बुडण्याच्या घटना का घडतात?
- बेभान पर्यटकांचा सर्वात मोठा दोष असतो.
- काहीजण किनाऱ्यावर मद्यधुंद होतात आणि त्या अवस्थेत पाण्यात जातात. मेंदूवर नियंत्रण नसलेल्या अवस्थेत खोल पाण्यात जाणे धोकादायक वाटत नाही.
- किनाऱ्या पावसाच्यावेळी जास्त ओहोटी येत असते, अशावेळी नागरिकांच्या बुडण्याच्या घटना जास्त घडतात.
- खोल पाण्यात जाणं हा नेहमीचा धोका असतो. पौंगडावस्थेतील मुलं सरेवात जास्त धोका पत्करतात.
- काही ठिकाणी मध्येच खडक असतात, जे पण खूप धोकादायक ठरु शकतात.
- नागरिकांना जाणीव पाहिजे की ते समु्द्रात गेल्यावर त्यांना कोणीही वाचवू शकत नाही.
- अनेकदा किनाऱ्यावर म्हणावे तेवढे जीवरक्षकही नसतात.
- हॅलिकॉप्टर रेस्क्यूला जर पाण्यात बुडताना कोणी दिसले तरच यावेळी ते जीव वाचवू शकतात.
समुद्र किनाऱ्यांवर कशी काळजी घ्यावी?
- पावसाच्यावेळी नागरिकांनी समुद्राच्या पाण्यात जाऊ नये, शक्यतो घरीच थांबावे.
- ओहोटीच्यावेळी खोल पाण्यात जाऊ नये, यावेळीही किनाऱ्यावर बसून समुद्राचा आनंद घ्यावा.
- स्थानिक लोकांचा सल्ला ऐकणे.
- गुडघ्याभर पाण्यात उतरावे, त्या अधिक पुढे जाऊ नये.
- सरकारने यंत्रणा सुसज्ज करावी.
- तिथल्या जीवरक्षकांच्या संख्येत वाढ करावी.
- नागरिकांना पाण्यात जाण्यापासून रोखावे.
- तसेच भरती, ओहोटीवेळी पाण्यातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काही नियम करावे.
- प्रत्येक किनाऱ्यावर रुग्णवाहिका असाव्यात.