मुक्तपीठ टीम
नारळ पाणी सर्व आजारांवर एक चांगला स्रोत मानल जात, कारण नारळ पाण्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य फायदे आणि पोषण असते जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. नारळात ९० टक्के सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात आणि १० टक्के असंतृप्त फॅटी ऍसिड असतात. यामधले पोषक तत्व शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. नारळाच्या पाण्यात खूप कमी कॅलरीज असतात. त्यात एन्झाईम्स, व्हिटॅमिन-सी, अमीनो-अॅसिड, अँटी-ऑक्सिडंट आणि इतर अनेक महत्त्वाचे गुणधर्म आहेत. त्याची टेस्टही खूप चविष्ट असते. याचे सतत सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. चला जाणून घेऊया, नारळ पाणी पिण्याचे काय काय फायदे आहेत…
वजन कमी करण्यास मदत करते
- वजन कमी करण्यासाठी हे एक सुपर ड्रिंक मानले जाते.
- त्यात कॅलरीज खूप कमी असतात.
- ते प्यायल्याने पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते.
- नारळाच्या पाण्यात बायोएक्टिव्ह एन्झाईम्स असतात, जे पचनशक्ती देखील मजबूत करतात.
- हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करते.
- हृदयरोग्यांसाठी ते खूप फायदेशीर आहे.
- यात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे लिवर निरोगी ठेवतात.
- हे लिवरमधील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
- त्यात लोह आणि व्हिटॅमिन-के मुबलक प्रमाणात असते.
- यातील पोषक घटक केसांना निरोगी बनवतात.
- केसांना नारळाच्या पाण्याने मसाज करा.
- यामुळे केसांची चमक वाढते आणि कोंडा दूर होण्यासही मदत होते.
- नारळाच्या पाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.
- त्याच्या वापराने किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
- गरोदरपणात अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची गरज असते.
- गर्भधारणेदरम्यान अनेक पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर आहे.