Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जातनिहाय जनगणना झाली तर नेमके काय घडेल? कोणाला फायदा?

August 23, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
cast based census

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांमागोमाग मराठा समाजातील काही नेत्यांकडून होत असलेली जातनिहाय आरक्षणाची मागणी आता राष्ट्रीय पातळीवरही उचलून धरली गेली आहे. बिहाराचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जातनिहाय जनगणनेवर योग्य निर्णयाचे आश्वासन दिले आहे. खरंतर भाजपाची भूमिका ही जातनिहाय जनगणनेविरोधातील असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्या भूमिकेला बदलणारा निर्णय़ पंतप्रधानांनी घेतला तर राजकारण आणि समाजकारणात मोठे बदल होतील. त्यामुळे आता जर जातनिहाय जनगणना झाली तर नेमके काय घडेल, जातनिहाय जनगणनेचा फायदा कोणाला मिळेल, ते समजून घेणे महत्वाचे आहे.

 

जातनिहाय जनगणना का महत्वाची?

  • भारतात ब्रिटिश अमदानीत १९३१मध्ये शेवटची जातनिहाय जनगणना झाली.
  • त्यानंतर भारतीय जनगणनेत जात हा घटक समाविष्ट नव्हता.
  • पुढे अनुसूचित जाती जमातींचा समावेश झाला. पण त्याशिवाय अन्य जाती नसतात.
  • त्यामुळे देशात मंडल आयोगापासून देण्यात आलेले ओबीसी किंवा अन्य आऱक्षण हे केवळ १९३१च्या जुन्या आकडेवारीवर आधारीत असते.
  • सध्या जातनिहाय जनगणनेची ९० वर्षात बदललेली आकडेवारी नसल्याने नवी आकडेवारी समाजातील लोकसंख्येचं वास्तव मांडेल.

जातनिहाय जनगणनेचा फायदा कुणाला आणि कसा?

  • आता नव्याने जर जातनिहाय जनगणना झाली तर प्रत्यक्षात कोणत्या जातीची किती लोकसंख्या त्याची नेमकी आकडेवारी मिळू शकेल.
  • अशी आकडेवारी मिळाली की कोणत्या जातीला किती आरक्षण, कोणत्या प्रवर्गात किती आरक्षण ते ठरवता येईल.
  • सध्या दिले जाणारे आरक्षण हे अंदाजे लोकसंख्या प्रमाण गृहित धरून दिलेले असते.
  • आरक्षण मिळालेल्या प्रवर्गांमधील कोणती जात आरक्षणाची किती लाभार्थी ठरली कोणती जात आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठरली तेही स्पष्ट होऊ शकेल.
  • त्यानुसारही नव्याने आरक्षणाचा लाभ प्रत्येक जातीला त्यांच्या आवश्यकते आणि संख्येनुसार देण्याविषयी फेरमांडणी करता येईल.
  • आरक्षणाप्रमाणेच सामाजिक न्यायाच्या योजनांचे कोणते लाभ, कोणत्या जातीपर्यंत किती प्रमाणात पोहचले आणि नाही पोहचले त्याची सांख्यिकी समोर येऊ शकेल.
  • एकदा जातनिहाय वास्तव सांख्यिकीतून समोर आलं की त्यानुसार सामाजिक न्यायाच्या योजनांची दिशा आणि लाभार्थी प्रमाण ठरवणं सोपं जाईल.

Tags: biharprime minister narendra modiअनुसूचित जाती जमातीओबीसीजातनिहाय जनगणनानितिश कुमारमराठा
Previous Post

जातनिहाय जनगणना: नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, योग्य निर्णयाचे आश्वासन!

Next Post

आमदार निलेश लंकेंवर तहसीलदार महिलेचे आरोप, तर इंदोरीकर महाराजांकडून समर्थन!

Next Post
Jyoti deore

आमदार निलेश लंकेंवर तहसीलदार महिलेचे आरोप, तर इंदोरीकर महाराजांकडून समर्थन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!