मुक्तपीठ टीम
नुकताच जियोफोन नेक्स्ट लॉन्च झाला आहे. हा फोन रिलायन्स जियो आणि गुगलने संयुक्तपणे बनवला आहे. हा स्मार्टफोन प्रगती ओएसवर चालतो. या फोनमध्ये असे अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत जे त्याला खास आणि स्मार्ट बनवतात. चला तर मग जाणून घेऊयात या स्मार्टफोनचे स्मार्ट फिचर्स.
कॅमेरा-युनिक सेल्फी फिचर-
- तुम्ही कोणत्याही फोनमध्ये सेल्फी घेता तेव्हा तुमची इमेज आणि टेक्स्ट उलटे दाखवले जातात पण जियोफोनमधील सेल्फी मोडमध्ये तुमची इमेज आणि टेक्स्ट सरळ दाखवले जातात.
- या फिचरमुळे तुम्हाला ते फोटो पुन्हा सरळ करावे लागणार नाहीत.
- फोनमधील स्टोरेजनुसार, तुम्ही किती फोटो काढू शकता किंवा किती वेळ व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकता हे कॅमेऱ्यात तुम्हाला दिसेल.
- जियोफोन नेक्स्टमध्ये ५००० हून अधिक फोटो स्टोअर केले जाऊ शकतात. या फिचरमुळे स्टोअरेज मॅनेज करण्यास मदत होईल.
- कॅमेरामध्येच स्नॅपचॅट आणि ट्रान्सलेट फीचर इनबिल्ट आहे.
- ट्रान्सलेशन फिचरच्या माध्यमातून कोणत्याही भाषेतील मजकुराचा फोटो काढून तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या भाषेत भाषांतरित करू शकता आणि ते ऐकूही शकता.
डिजिटल वेलबिइंग
- जियोफोन नेक्स्टचे आणखी एक उत्कृष्ट फिचर म्हणजे डिजिटल वेलबिइंग आणि पॅरेंटल कंट्रोल आहे.
- यामध्ये कोणत्या अॅपवर किती वेळ स्क्रीन टाईम देण्यात आला हे ही पाहता येईल.
- फोन किती वेळ अनलॉक केला आहे हे देखील ते दर्शवेल.
- यामध्ये तुम्हाला डू नॉट डिस्टर्ब हे फीचर मिळेल. यात पॅरेंटल लॉक देखील आहे.
तोंडाने बोलून टाइप करा…
- व्हॉइस टायपिंग, वन हँड मोड, ग्लाइड टायपिंग, पर्सनल डिक्शनरी यांसारखे फिचर्स कीबोर्डमध्ये उपलब्ध आहेत.
- जियोफोन नेक्स्टचे लाइव्ह ट्रान्स्क्राइब अॅप वापरून तुम्ही सहजपणे टाइप करू शकता. यासाठी कीबोर्डवर हात चालवण्याचा त्रास संपेल.
नाईट लाइट फीचर
- डिस्प्लेमध्ये तुम्हाला नाईट लाइट फिचर मिळेल जे झोपताना फोनचा प्रकाश कमी करेल.
- यामुळे तुमच्या डोळ्यांवर ताण येणार नाही आणि झोप येण्यास मदत होईल.
स्क्रीन शॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग
- जियोफोन नेक्स्टमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी नोटिफिकेशन पॅनेलमध्ये एक बटण आहे, ज्यामुळे तुमच्या स्क्रीनवर जे काही प्ले होत आहे ते रेकॉर्ड करता येते.
- तसेच, एका टचमध्ये स्क्रीन शॉट्सही घेता येणार आहे.
स्क्रीन रीडर आणि ट्रान्सलेशन
- फोनमध्ये स्क्रीन रीडिंग आणि भाषांतराचे एक उत्तम फिचर आहे.
- यामध्ये तुम्हाला १० भारतीय भाषांमध्ये भाषांतराची सुविधा मिळते.
नोटिफिकेशन पॅनल
- जियोफोन नेक्स्ट मधील ड्रॉप डाउन नोटिफिकेशन पॅनलमध्ये तुम्हाला फोकस मोड, इनव्हर्ट कलर, स्क्रीन रेकॉर्ड आणि स्टोअरेजचा पर्याय मिळेल.
- नोटिफिकेशन पॅनलमध्येच स्टोरेजचा पर्याय मिळाल्याने तुम्हाला लगेच स्टोअरेज पाहायला मिळते.
फोकस मोड
- जर तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे असेल आणि तुमच्या फोनमध्ये काही अॅप्स वापरायचे असतील तर तुम्ही फोकस मोडमध्ये अॅप्सला विराम देऊ शकता आणि त्यांचे नोटिफिकेशन बंद करू शकता.
- तुम्हाला बेडटाइम मोड ही मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमची झोपेची वेळ आणि स्क्रीनची वेळ मॉनिटर करू शकता.
गुगल गो
- जियोफोन नेक्स्टमध्ये, तुम्हाला गुगल गो अॅप मिळेल ज्यामध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी सर्च, ट्रान्सलेट, इमेज आणि जीफ इमेज सर्चचे ऑप्शन्स मिळतात.
- गुगल गोमध्ये इमेजेस किंवा जीफ शोधताना तुम्हाला जास्त त्रास सहन करावा लागणार नाही.
फोनमध्ये पेन ड्राईव्ह
- फोनमध्ये ओटीजी सपोर्ट देखील आहे.
- ओटीजी पेनड्राईव्ह फोनमध्ये ठेवून वापरता येईल.
- यामुळे फोनचे स्टोरेज मॅनेज करण्यास मदत मिळेल.