मुक्तपीठ टीम
पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना महत्वाची बातमी आहे. पालघर-वनागाव मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम होणार आहे. पालघर – वनगाव सेक्शनमधील ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होईल. या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी काही बाहेरगावच्या एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त स्थानकांवर थांबवलं जाईल. हा ब्लॉक २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान एक तासासाठी (सकाळी १०.१० ते रात्री ११.१० पर्यंत) असणार आहे. बोईसर ते वाणगाव दरम्यान काम करण्यात येणार असून पालघर स्थानकात ओएचई गिअर दुरुस्तीमुळे उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना याचा फटका बसणार आहे.
कोणत्या गाड्यांवर परिणाम होणार…
- ट्रेन क्रमांक ९३०१३ चर्चगेट-डहाणू रोड लोकल केळवे रोड-डहाणू रोड दरम्यान अंशतः रद्द राहील
- गाडी क्रमांक ९३०१२ डहाणू रोड-विरार लोकल डहाणू रोड-केळवे रोड दरम्यान अंशतः रद्द राहील
लांब पल्ल्याच्या गाड्यांचे काय होणार?
- ट्रेन क्रमांक १२९३४ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेसला २४, २६, २७ आणि २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पालघर आणि विरार स्थानकांवर अतिरिक्त स्थानकांवर थांबवलं जाईल. या ट्रेनला बोईसर आणि विरार स्थानकांवर २५ फेब्रुवारी २०२२ रोजी अतिरिक्त स्थानकांवर थांबवलं जाईल.
- गाडी क्रमांक १२९९० अजमेर-दादर सुपरफास्ट एक्स्प्रेसला २४, २६ आणि २८ फेब्रुवारी २०२२ रोजी बोईसर आणि विरार स्थानकांवर अतिरिक्त थांबवलं जाईल.
- गाडी क्रमांक ०९१५९ वांद्रे टर्मिनस-वापी एक्सप्रेसला २४ ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान उमरोली स्थानकावर अतिरिक्त थांबवलं जाईल.
- गाडी क्रमांक २२९५२ गांधीधाम-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसला २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पालघर आणि विरार स्थानकावर अतिरिक्त थांबवलं जाईल.
- ट्रेन क्रमांक १२४८९ बिकानेर-दादर एक्स्प्रेसला २७ फेब्रुवारी २०२२ रोजी बोईसर आणि विरार स्थानकावर अतिरिक्त थांबवलं जाईल.