Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्व महाग झालं…आता १ डिसेंबरपासून टीव्ही पाहणेही महागणार!

October 21, 2021
in featured, घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
tv channels

मुक्तपीठ टीम

कधी डिझेल, कधी पेट्रोल, कधी खाद्य तेल तर कधी रोजच्या वापरातील वस्तू. महागाईचा भडका रोजच चटका देत असतो. आता महागाई भडक्याचा हा डेली सोप टीव्ही चॅनल्सच्या क्षेत्रातही सुरु होत आहे. एक डिसेंबरपासून टीव्ही पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण काही लोकप्रिय निवडक चॅनल्सचे दर १ डिसेंबरपासून वाढणार आहेत.

 

ट्राईच्या यादीतून वगळल्याने दरवाढीची संधी

  • देशाच्या प्रमुख प्रसारण नेटवर्क ZEE, STAR, SONY, VIACOM 18 ने दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) प्रस्तावित सूचीमधून त्यांच्या काही वाहिन्यांना वगळले आहे.
  • स्टार प्लस, कलर्स, सोनी, झी सारख्या चॅनेलसाठी दर्शकांना ३५ ते ५० टक्के अधिक दर मोजावे लागणार आहेत.
  • सध्या या वाहिन्यांचे सरासरी दर ४९ रुपये प्रति महिना आहे, जे दरमहा ६९ रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकतात.

 

कोणत्या चॅनलसाठी किती जास्त खर्च?

  • सोनीसाठी ३९ रुपयांऐवजी ७१ रुपये दरमहा खर्च करावे लागतील.
  • झीचा दर ३९ रुपयांऐवजी ४९ रुपये होणार आहे.
  • वायाकॉम 18 चॅनेलसाठी दरमहा २५ रुपयांऐवजी ३९ रुपये दरमहा असेल.

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे टीव्ही पाहणे महाग होणार आहे. ट्राय ने मार्च २०१७ मध्ये टीव्ही चॅनल्सच्या किंमतींबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) जारी केली होती. ट्रायनुसार एनटीओ २.०नुसार प्रेक्षक फक्त तेच चॅनेल निवडून पैसे देऊ शकतील जे त्यांना पाहायचे आहे. तथापि, समस्या अशी आहे की ज्या चॅनलचे मासिक मूल्य ब्रॉडकास्टिंग नेटवर्कद्वारे १५-२५ रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आले होते, त्यांना ट्रायच्या नवीन दर आदेशामुळे फक्त १२ रुपये निश्चित करण्यात आले होते. यामुळे ब्रॉडकास्टर चॅनलचे नुकसान झाले. यामुळे आता त्या यादीतून नावे काढत चॅनल्सनी दरवाढीचा मार्ग निवडला आहे.


Tags: sonystarTRAIVIACOM 18ZEEकलर्सझीभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणसोनीस्टार प्लस
Previous Post

पंडित नेहरु इतिहासात महत्वपूर्ण होतेच, वर्तमानात महत्वपूर्ण आहेत आणि भविष्यातही राहतील!: प्रा. पुरुषोत्तम अगरवाल

Next Post

नाशिकचं साहित्य संमेलन डिसेंबरमध्ये, पण आता स्थळ बदलल्यानं वाद!

Next Post
sahitya sammelan

नाशिकचं साहित्य संमेलन डिसेंबरमध्ये, पण आता स्थळ बदलल्यानं वाद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!