मुक्तपीठ टीम
वारीला जाण्याआधी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. आषाढी वारी २०२१ ची नियोजनाला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिला आहे. वारीसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार आषाढीला मानाच्या १० पालख्या एसटी बसमधूनच येणार असल्याचं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- पायी वारीच्या मागणीसाठी वारकरी आणि महाराज मंडळींकडून मागणी जोर धरू लागली.
- भाजप नेत्यांनीही नियम घालून पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केली होती.
- मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने यंदाही एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
- त्या पार्श्वभूमीवर आज सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे.
अशी असेल यंदाची वारी
- शासकीय महापूजा गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार आहे.
- भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार.
- केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील.
- रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे,
- आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या १९५ संत महाराज मंडळींना विठ्ठलाचं मुखदर्शन देण्याचा निर्णय शासन आदेशात नमूद आहे.
- तर पौर्णिमेलाच काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत फिरतील.