Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनामुक्त झालेले किती दिवसानंतर शस्त्रक्रिया करू शकतात?

आयसीएमआरचा सल्ला खूप महत्वाचा असा...

September 6, 2026
in आरोग्य
0
ICMR (3)

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीच्या साथीला तसं दीड वर्ष उलटले आहे. पण तरीही कोरोनाबद्दल अद्यापही संपूर्ण माहितीचा अभावच आहे. त्यामुळे प्रत्येकालाच अनेक प्रश्न पडतात. त्यातील एक महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांचा कोरोना बरा झाला त्यांना जर एखादी शस्त्रक्रिया करायची असेल तर त्यांनी ती कधी करावी? इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने याबद्दल दिलेली माहिती महत्वाची आहे.

 

बरे झाल्यानंतर १०२ दिवसात पुन्हा कोरोना चाचणी न करण्याचा सल्ला

  • जर एखादी शस्त्रक्रिया करायची असेल तर त्यापूर्वी सर्जनकडून प्री- ऑपरेटिव्ह प्रोटोकॉलचा भाग म्हणून पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्यास सांगितले जाते.
  • मात्र, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि कोरोनाच्या राष्ट्रीय टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी बरे झाल्यानंतर १०२ दिवसात पुन्हा कोरोना चाचणी न करण्याचा सल्ला दिला आहे.
  • याचे कारण शरीरात काही काळ राहिलेल्या “नॉन वायबल डेड वायरस पार्टिकल” राहिले असल्यामुळे चुकीच्या निदानाचे सांगितले आहे.
  • या विषाणूचे अवशेष हा रोग पसरवू शकत नाहीत, परंतु चुकीचा पॉझिटिव्ह परिणाम देऊ शकतात.

 

सहा महिन्यांनंतर शस्त्रक्रियेचा विचार करा

  • सर्जननी कोरोनामधून बरे झालेल्या लोकांवर सहा महिन्यांनंतरच शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला पाहिजे.
  • शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पूर्ण वेळ मिळेल व तो लवकर बरा होईल, सर्जने याची खात्री करुन घ्यावी.
  • कोरोनातून बरे झाल्यानंतर १०२ दिवसानंतरच पुन्हा कोरोनाच्या संसर्गाची पुष्टी होते.
  • त्यामुळेच या कालावधीत पुन्हा चाचणी करणे उचित नाही.

तातडीची शस्त्रक्रिया करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक

  • कोरोनामुळे बरे झालेल्या रूग्णांची तातडीने शस्त्रक्रिया करण्यापूर्वी किमान सहा आठवड्यांच्या अंतराची शिफारस केली जाते.
  • खूपच निकडीच्या आपत्कालीन शस्त्रक्रियेबद्दल बोलायचे तर, त्वरित योग्य खबरदारी घेतली पाहिजे.
  • जर एखाद्या रूग्णात पुन्हा कोरोनाची लक्षणे दिसून आली, तर ते पुन्हा चाचणीसह संसर्गजन्य रोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा विचार करू शकतात.

शस्त्रक्रियेसाठी किती काळ वाट पाहावी?

  • लक्षणे नसलेले रूग्ण किंवा केवळ सौम्य, श्वासोच्छवासाशी संबंधित लक्षणांपासून बरे झालेल्या व्यक्तीसाठी – ४ आठवडे
  • खोकला, धाप लागणे, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही अशा इतर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी – ६ आठवडे
  • लक्षणे असलेल्या रोग्यांसाठी, ज्यांना मधुमेहाचे निदान झाले आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे – ८-१० आठवडे
  • कोरोनासह आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रूग्णासाठी- १२ आठवडे
  • १०२ दिवसात कोरोनाची परत चाचणी करू नये.

 

(कृपया आपल्या शस्त्रक्रियेबद्दलचा निर्णय हा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा.)


Tags: coronaICMRआयसीएमआरइंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकोरोना
Previous Post

मराठा समाजामधील असंतोष कमी करण्यासाठी राज्यात १०% आर्थिक मागास आरक्षण लागू

Next Post

“लॉकडाऊन सोबत अर्थव्यवस्थेचाही आता विचार करा”

Next Post
anand gadgil

"लॉकडाऊन सोबत अर्थव्यवस्थेचाही आता विचार करा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!