Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवी मुंबई, वसई- विरार व कोल्हापूर मनपाच्या मतदार याद्या १६ फेब्रुवारीला

February 3, 2021
in सरकारी बातम्या
0
Navi-Mumbai-Municipal-Corp

मुक्तपीठ टीम

 

नवी मुंबई, वसई-विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी  तसेच इतर विविध १६ महानगरपालिकांतील २५ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता  फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

 

मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १५ जानेवारी २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १६ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर ३ मार्च २०२१ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. ८ मार्च २०२१ रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर १२ मार्च २०२१ रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

 

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती मदान यांनी दिली.

 

 विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे

 

नाशिक- ४अ (निधन), धुळे- ५ब (राजीनामा), परभणी- ११ब (निधन), १४क (निधन), ठाणे- ३०अ (जात प्रमाणपत्र अवैध), १५ड (निधन), २३ड (निधन), अहमदनगर- ९क (अनर्ह), नांदेड वाघाळा- १३अ (निधन), नागपूर- ८ब (जात प्रमाणपत्र अवैध), मीरा भाईंदर- १०ड (निधन), मालेगाव- २०क (निधन), पिंपरी चिंचवड- १ड (निधन), १४अ (निधन), ४ब (निधन), उल्हासनगर- १४ड (निधन), ८क (निधन) सोलापूर- ६क (निधन), सांगली मिरज कुपवाड- १६अ (निधन), अकोला- ४अ (निधन), ८क (निधन), ३क (निधन), भिवंडी निजामपूर- ९ब (राजीनामा), पुणे- ८क (निधन) आणि २९ब (निधन).


Tags: KolhapurKolhapur Municipal Corporationnavi mumbaivasaiVirarकोल्हापूरनवी मुंबईमतदार याद्यावसईविरार
Previous Post

“परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक वाहतूकीवर भर”

Next Post

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या मतदार याद्या ११ फेब्रुवारीला

Next Post
Gondiya

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या मतदार याद्या ११ फेब्रुवारीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!